Xiaomi चालली Apple च्या वाटेवर, चार्जरविना लॉन्च केला 108MP कॅमेरा असलेला Mi 11, सर्वात ताकदवान प्रोसेसर आहे यात

Mi 11

Xiaomi ने सोमवारी एका इवेंटचे आयोजन करून आपल्या घरच्या मार्केट मध्ये मी 11 सीरीज लॉन्च केली आहे. फ्लॅगशिप मी 11 सीरीज मध्ये कंपनीने सध्या Mi 11 स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन आधी लॉन्च केलेल्या मी 10 स्मार्टफोन्सच्या तुलनेत अनेक अपग्रेडेड फीचर्स सह आला आहे. इतकेच नव्हे तर शाओमीचा हा पहिला स्मार्टफोन आहे ज्याच्यासोबत चार्जर देण्यात आला नाही. याआधी ऍप्पलने पण आपल्या आयफोन 12 सीरीज सह असे केले होते.

डिजाइन

डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर Mi 11 च्या फ्रंटला पंच-होल कट आउट देण्यात आला आहे जो डावीकडे वरच्या बाजूला आहे. फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत. सोबतच फोनची दोन्ही बाजूंची स्क्रीन कर्व्ड आहे, ज्यामुळे फुल व्यू स्क्रीनचा एक चांगला अनुभव मिळतो. इतकेच नव्हे तर या डिस्प्ले मध्ये चारही बाजूनी साइड कर्व्ड एजेज आहेत. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि पावर बटन मिळतील. तसेच मागे कंपनीने ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे जो चौकोनी मॉड्यूल मध्ये आहे, ज्यात तीन कॅमेरा लेंस सह एक एलईडी पण आहे.

डिस्प्ले

Mi 11 मध्ये 1500 nits ब्राइटनेस, 480Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 120Hz रिफ्रेश रेट सह 6.81-इंचाचा 2K WQHD (1,440×3,200 पिक्सल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल डिजाइन आहे. शाओमीने या डिस्प्ले मध्ये HDR10+ सपोर्ट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन दिले आहे.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह फक्त 10,999 रुपयांमध्ये लाॅन्च झाला Xiaomi Redmi 9 Power

सर्वात ताकदवान प्रोसेसर

Mi 11 जगातील पहिला फोन आहे जो Snapdragon 888 प्रोसेसर सह सादर केला गेला आहे. स्नॅपड्रॅगॉन 888 पाहता हा मागील प्रोसेसरच्या तुलनेत मोठ्या अपग्रेड सह येतो. क्वालकॉमच्या बेंचमार्क रिजल्ट मध्ये या चिपसेट सह सीपीयू, ग्राफिक्स आणि AI सह दुसऱ्या डिपार्टमेंट्स मध्ये चांगली परफॉर्मन्स दिसली होती.

कॅमेरा

Mi 11 मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप चौकोनी मॉड्यूल मध्ये दिला आहे. यात अपर्चर f/1.85 सह 108MP प्राइमरी सेंसर, 13MP (f/2.4 aperture) अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि 5MP (f/2.4 aperture) टेलिफोटो कॅमेरा लेंस आहे. तसेच फोन मध्ये MEMC व्हिडीओ फ्रेम टेक्नोलॉजी, OIS, रियल-टाइम SDR टू HDR आणि व्हिडीओ सूपर-रिजोल्यूशनला सपोर्ट आहे. सेल्फी कॅमेरा पाहता फ्रंटला 20MP चा कॅमेरा मिळेल.

रॅम व स्टोरेज

डुअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला Mi 11 अँड्रॉइड 10 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. तसेच स्मार्टफोन मध्ये 12GB LPDDR5 रॅम सह इंटरनल मेमोरी 256GB (UFS 3.1) पर्यंत आहे.

हे देखील वाचा : Xiaomi घेऊन येत आहे 108MP कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन Mi 10i, 5 जानेवारीला होईल भारतात लॉन्च

कनेक्टिविटी फीचर्स आणि बॅटरी

Mi 11 मध्ये स्टीरियो स्पीकर्स देण्यात आले आहेत, ज्याची ट्यूनिंग Harman Kardon ने केले आहे. सोबतच इथे बिल्ट-इन हार्ट रेट सेंसर सह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. यात NFC आणि Wi-Fi 6E सपोर्ट पण आहे आणि हा दोन ब्लूटूथ हेडसेट्स एक साथ कनेक्टड राहू शकतो. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,600mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी Mi TurboCharge 55W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. सोबतच यात 10W वायरलेस रिवर्स चार्जिंग सपोर्ट पण आहे.

किंमत

Xiaomi Mi 11 तीन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. या फोनचा 8GB + 128GB वेरिएंटसाठी CNY 3,999 (जवळपास 45,000 रुपये), 8GB + 256GB वेरिएंटसाठी CNY 4,299 (जवळपास 48,300 रुपये) आणि 12GB + 256GB वेरिएंटसाठी CNY 4,699 (जवळपास 52,800 रुपये) द्यावे लागतील. हा फोन ब्लू, व्हाइट आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होईल. तसीच याचा एक विशेष लेदर वेरिएंट पण येईल जो ऑरेंज आणि पर्पल कलर मध्ये येईल. स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर सुरु झाली आहे आणि यह एक जानेवारीला चीन मध्ये विक्रीसाठी येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here