Home Featured 5,500 एमएएच बॅटरी, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला शाओमी मी मॅक्स 3, जाणून घ्या या फोन बद्दल सर्व काही

5,500 एमएएच बॅटरी, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला शाओमी मी मॅक्स 3, जाणून घ्या या फोन बद्दल सर्व काही

तुम्हाला माहितीच आहे दरवर्षी शाओमी आपल्या फॅबलेट सीरीज मध्ये एक फोन लॉन्च करते. कपंनी ने मागच्या वर्षी मी मॅक्स 2 आणला होता आणि काही महीन्यांपासुन मी मॅक्स 3 बद्दल खुप चर्चा सुरू होती. आज कंपनी ने हा फोन जगासमोर आणला आहे. शाओमी मी मॅक्स 3 सध्यातरी चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे पण लवकरच हा भारतात येईल. मोठ्या स्क्रीन वाला हा फोन 5,500 एमएएच बॅटरी सह सादर करण्यात आला आहे. खाली आम्ही फोन बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

डिजाइन

शाओमी मी मिक्स 3 मेटल डिजाइन मध्ये सादर करण्यात आला आहे. याच्या आधीच्या मॉडेल पेक्षा याच स्क्रीन मोठी आहे पण आकारात जास्त फरक जाणवत नाही. फोन ची लांबी 176.2 एमएम आहे आणि जाडी 8एमएम. याची एल्यूमिनियम बॉडी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा फील देईल. फ्रंट पॅनल वर कोणतेही हार्डवेयर बटन नाही तर मागच्या पॅनल वर तुम्हाला डुअल कॅमेरा मिळू शकतो.

डिस्प्ले

शाओमी मी मॅक्स 3 ला कंपनी ने 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर केले आहे. फोन मध्ये 6.9-इंचाचा फुल एचडी+ मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1080 x 2160 पिक्सल रेजल्यूशन सह येतो. चांगली बाब म्हणजे फोन ची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 कोटेड आहे ज्यामुळे ही मजबूत होते.

प्रोसेसर

आधी पासून चर्चा सुरू होती की शाओमी मी मॅक्स 3 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह येईल पण असे नाही झाले. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट सह उपलब्ध झाला आहे. फोन में 1.8गीगाहर्ट्ज cha आॅक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत एड्रीनो 509 जीपीयू आहे.

मेमरी

हा फोन दोन मेमरी वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. कंपनी ने हा 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी सह सादर केला आहे. फोन मध्ये एक्सपांडेबल मेमरी सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी पर्यंतच कार्ड वापरु शकता. पण लक्षात ठेवा दुसरा स्लॉट हाईब्रीड आहे ज्यात तुम्ही मेमरी कार्ड किंवा सिम पैकी एक काही तरी वापरू शकता.

कॅमेरा

शाआमी ने मी ​मॅक्स 3 मध्ये पण डुअल रियर कॅमेरा दिला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर ​दिले आहेत जे एफ/2.2 अपर्चर सह उपलब्ध आहेत. तर सेल्फी साठी कंपनी ने यात 8— मेगापिक्सील चा कॅमेरा दिला आहे. फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला कॅमेरा सेंसर आहे.

आॅपरेटिंग सिस्टम

हा फोन मीयूआई आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो जी एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित आहे.

कनेक्टिविटी
डाटा व कनेक्टिविटी साठी यात डुअल सिम सोबत 4जी वोएलटीई मिळेल. त्याचबरोबर वाईफाई, ब्लूटूथ 5.0, ग्लोनास आणि यूएसबी टाइप सी देण्यात आली आहे. त्यासोबत आईआर ब्लास्टर पण आहे जो वापरून तुम्ही फोन चा वापर यूनिवर्सल रिमोट म्हणून करू शकता.

किंमत
शाओमी मी मॅक्स 3 च्या 4जीबी रॅम आणि 32जीबी मेमरी वाल्या वेरियंट ची किंमत 1,699 यूआन आहे जी भारतीय किंमती नुसार जवळपास 17,300 रुपये होते. तर 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी वाल्या वेरियंट ची किंमत 1,999 यूआन आहे जी भारतीय रुपयां नुसार जवळपास 20,400 आहे. हा फोन ब्लॅक, गोल्ड आणि ब्लू अशा तिन वेरियंट मध्ये येईल.