Home बातम्या Xiaomi ने लॉन्च केला अजून एक स्वस्त स्मार्टफोन Redmi 9AT, यात मिळेल 5,000एमएएच ची मोठी बॅटरी

Xiaomi ने लॉन्च केला अजून एक स्वस्त स्मार्टफोन Redmi 9AT, यात मिळेल 5,000एमएएच ची मोठी बॅटरी

Xiaomihttps://www.91mobiles.com/hi/xiaomi-mobile-price-list-in-india ने या महिन्याच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपल्या ‘रेडमी 9’ सीरीजचा विस्तार करत लो बजेट डिवाईस Redmi 9A लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन 6,799 रुपयांच्या बेस किंमतीत आला होता जो दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. भारतात रेडमी 9ए च्या यशानंतर शाओमीने अंर्तराष्ट्रीय बाजारात या सीरीजचा अजून एक नवीन स्मार्टफोन Redmi 9AT नावाने लॉन्च केला आहे. हा फोन पण लो बजेट मध्ये सादर केला गेला आहे जो सध्या स्पेन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Redmi 9AT स्मार्टफोन भारतात लॉन्च झालेल्या Redmi 9A चा अपग्रेडेड वर्जन आहे. हा फोन लुक आणि डिजाईनच्या बाबतीत पूर्णपणे रेडमी 9ए सारखा आहे. कंपनीने रेडमी 9एटी चे स्पेसिफिकेशन्स पण रेडमी 9ए सारखेच ठेवले आहेत. स्पेन मध्ये लॉन्च करण्यात आलेला हा फोन कंपनीने तीन माइक्रोफोन्स सह सादर केला आहे ज्यामुळे हा फोन चांगले नॉइज कॅन्सलेशन देतो. रेडमी 9एटी 2 जीबी रॅम 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत 119 यूरो म्हणजे जवळपास 10,300 रुपये आहे.

https://img.hi.91mobiles.com/uploads/2020/09/Redmi-9AT.jpg

हे देखील वाचा: फक्त 6,799 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi चा 5,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Redmi 9A

Xiaomi Redmi 9AT

रेडमी 9एटी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. Redmi 9AT एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो मीयूआई 12 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला हीलियो जी25 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन पावरवीआर जीई8329 जीपीयू ला सपोर्ट करतो.

स्पेन मध्ये हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 2 जीबी सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता शाओमी रेडमी 9एटी एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: 8,999 रुपयांमध्ये Redmi 9 कि Realme C12 कोणता बजेट स्मार्टफोन आहे बेस्ट?

Redmi 9AT एक रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड एकत्र वापरता येतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करणारा हा फोन 4जी वोएलटीई सह चालतो. सिक्योरिटीसाठी शाओमीने रेडमी 9एटी स्मार्टफोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. स्पेन मध्ये हा फोन Green, Blue आणि Black कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.