Xiaomi ने आज भारतीय बाजारात आपल्या ‘रेडमी 9’ सीरीजचा अजून एक नवीन स्मार्टफोन Redmi 9i लॉन्च केला आहे. या सीरीज मध्ये Redmi 9, Redmi 9A, आणि Redmi 9 Prime मॉडेल आधीच सादर केले गेले आहेत. आता कंपनीने या किफायतशीर सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन रेडमी 9आय नावाने जोडला आहे. रेडमी 9आय च्या उपलब्धतेची माहिती आधीच मिळाली होती कि याची विक्री Flipkart आणि Mi.com वर केली जाईल. हा हँडसेट वाटरड्रॉप-स्टाइल नॉच आणि 3.5 एमएम ऑडियो जॅकला सपोर्ट करतो. सोबतच कंपनीने हा फोन दमदार बॅटरी लाइफ आणि चांगल्या डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स सह सादर केला आहे.
डिजाइन
रेडमी 9आय वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. तसेच वरच्या बाजूला 3.5एमएम जॅक आहे. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजव्या पॅनल वर आहे. तसेच फोनच्या बॉटमला चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे. बॅक पॅनल पाहता यात वर्टिकल शेप मध्ये सिंगल कॅमेरा डावीकडे आहे, ज्या सोबत एलईडी फ्लॅश पण देण्यात आला आहे. बजेट कॅटेगरी मध्ये सादर केला गेलेला हा फोन तीन कलर ऑप्शन मध्ये येतो, ज्यात Nature Green, Sea Blue आणि Midnight Black कलरचा समावेश आहे.
हे देखील वाचा: Xiaomi ने लॉन्च केला अजून एक स्वस्त स्मार्टफोन Redmi 9AT, यात मिळेल 5,000एमएएच ची मोठी बॅटरी
स्पेसिफिकेशन्स
Redmi 9i मध्ये 6.53-इंचाचा HD+ (720×1600) डॉट ड्रॉप डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. फोन TUV Rheinland सर्टिफिकेशन सह येतो. इतकेच नव्हे तर फोन मध्ये Aura 360 डिजाइन टेक्चर बॅक आहे. स्मार्टफोन 2.0 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G25 चिपसेट वर सादर केला गेला आहे जो एक एंट्री लेवल गेमिंग चिपसेट आहे आणि 12nm टेक्नोलॉजी वर बनवण्यात आला आहे. डिवाइस मध्ये 4GB रॅम सह 64GB आणि 128GB इंटरनल स्टोरेजचा ऑप्शन आहे.
पावर बॅकअपसाठी Redmi 9i मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोन Android 10 बेस्ड MIUI 12 आउट ऑफ द बॉक्स आणि सिस्टम-वाइड डार्क मोड सह येतो. फोटोग्राफीसाठी Redmi 9i च्या मागे सिंगल 13 मेगापिक्सल AI कॅमेरा आणि फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा डिवाइस इतर फीचर्स जसे कि 10W चार्जिंग सपोर्ट, डुअल सिम स्लॉट, 4G VoLTE, वाई-फाई 802.11 b / g / n, ब्लूटूथ 5.0, GPS, microUSB, एक 3.5mm ऑडियो जॅक आणि P2i स्प्लॅश-प्रतिरोधी कोटिंग सह येतो.
हे देखील वाचा: फक्त 6,799 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi चा 5,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Redmi 9A
किंमत
रेडमी 9आय च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची किंमत 8,299 रुपये आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज एडिशनची किंमत 9,299 रुपये आहे. हँडसेट नेचर ग्रीन, सी ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक सारख्या कलर वेरिएंट मध्ये येतो. रेडमी 9आय ची पहिली विक्री फ्लिपकार्ट, Mi.com आणि Mi स्टोर सारख्या प्लॅटफॉर्म वरून 18 सप्टेंबरला 12 वाजता होईल.
