शाओमीने गेल्या महिन्यात भारतात आपल्या रेडमी सीरीजचा विस्तार करत कंपनीचा एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन रेडमी गो लॉन्च केला होता. रेडमी गो शाओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे जो 4,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. कमी किंमत आणि शानदार स्पेसिफिकेशन्स मुळे रेडमी गो लॉन्च होताच हा फोन इंडियन स्मार्टफोन यूजर्स मध्ये लोकप्रिय झाला. रेडमी गो भारतात फ्लॅश सेलच्या माध्यमातुन उपलब्ध मिळत होता तसेच प्रत्येक सेल मध्ये रेडमी गो काही मिनिटांत हा फोन आउट ऑफ स्टॉक होत होता. अनेक शाओमी फॅन्स फोन न मिळाल्याने निराश होत होते. पण आता शाओमी ने आपल्या फॅन्सना भेट देत घोषणा केली आहे की रेडमी गो आता ओपन सेल मध्ये उपलब्ध होईल.
शाओमी इंडिया ने अधिकृतपणे घोषणा करत सांगितले आहे कि रेडमी गो विकत घेण्यासाठी आता कोणत्याही फ्लॅश सेलची वाट बघावी लागणार नाही. शाओमी इंडिया ने रेडमी गो भारतात ओपन सेल साठी उपलब्ध केला आहे. रडमी गो स्मार्टफोन आज पासून शाओमीच्या अधिकृत वेबसाइट मी डॉट कॉम सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण सेल साठी उपलब्ध होईल. आनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच रेडमी गो मी होम मधून पण विकत घेता येईल.
Ab rakhiye kadam #AapkiNayiDuniya me jab aap chahen. #RedmiGo is now available anytime on https://t.co/cwYEXdVQIo, @Flipkart and Mi Home. pic.twitter.com/Zs6Rtizc47
— Redmi India (@RedmiIndia) April 8, 2019
एंडरॉयड गो
शाओमी रेडमी गो ची सर्वात मोठी खासियत या फोनचे एंडरॉयड गो वर्जन वर लॉन्च होणे आहे. या फोन मध्ये गूगल ऍप्लीकेशन्सचे लाइट वर्जन असतील. या ऍप्स मध्ये मॅप्स गो, यूट्यूब गो, जीमेल गो, क्रोम गो सोबत गूगल गो आणि गूगल असिस्टेंट गो पण असेल. गो वर्जन असल्यामुळे हे ऍप्स फोनच्या इंटरनल मेमरी मध्ये कमी जागा घेतील आणि इंटरनेट वर चालताना देता कमी वापरतील. तसेच एंडरॉयड गो ऍप्स फोनची बॅटरी पण जास्त खाणार नाहीत.
हे देखील वाचा: 60 लाख यूजर जोडल्याचा आनंद साजरा करत आहे रियलमी, 4 दिवस स्वस्त मिळतील फोन, सोबत फ्री गिफ्ट
रेडमी गो चे स्पेसिफिकेशन्स
एंडरॉयड गो असल्यामुळे शाओमीच्या या फोनला येणाऱ्या एंडरॉयडचे नवीन अपडेट पण या फोनला इतरांच्या आधी मिळतील. स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमी रेडमी गो को 16:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे. फोन मध्ये 5.0-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो.
हा फोन एंडरॉयड ओरियोच्या के गो एडिशन वर सादर केला गेला आहे जो लवकरच एंडरॉयड 9 पाई वर अपडेट होईल. रेडमी गो कंपनी द्वारा 1जीबी रॅम सोबत 8जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. रेडमी गो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे.
हे देखील वाचा: लॉन्चच्या आधी लीक झाले रियलमी 3 प्रो चे स्पेसिफिकेशन्स, स्नॅपड्रॅगॉन 710 असेल यात
रेडमी गो भारतात 1जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे. फोन 8जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. रेडमी गो चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रेडमी गो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो.
इंडियन स्माटफोन यूजर साठी खास बाब अशी कि रेडमी गो 20 पेक्षा जास्त भारतीय क्षेत्रिय भाषा समजू शकेल आणि त्याच भाषेत चालेल पण. ब्लूटूथ, वाईफाई, आईआर ब्लास्ट सारख्या बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी रेडमी गो मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
