लॉन्चच्या आधी लीक झाले रियलमी 3 प्रो चे स्पेसिफिकेशन्स, स्नॅपड्रॅगॉन 710 असेल यात

रियलमी ब्रँड मध्ये मागच्या महिन्यात कंपनीचा नवीन स्मार्टफोन रियलमी 3 प्रो लॉन्च केला गेला होता. या फोन ने बाजारात येताच यशाचे नवीन रिकॉर्ड केले. इंडिया लॉन्च नंतर हा फोन फक्त 3 वेळा मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे आणि रियलमी 3 ने बाजारात आल्यानंतर तीन आठवडयांनी 5 लाख यूनिट विकले. 3 आठवड्यांत 5 लाखांपेक्षा जास्त रियलमी 3 फोन विकले आहेत. रियलमीचे यश कंपनीला आता अजून वाढवायचे आहे. कंपनी यापेक्षा पण शानदार आणि दमदार फोन रियलमी 3 प्रो आणण्याची तयारी करत आहे, जो याच महिन्यात बाजारात येऊ शकतो. कंपनी ने अजूनतरी या फोनच्या लॉन्चची माहिती दिली नाही, पण रियलमी 3 प्रो च्या एंट्री च्या आधीच या फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक मधून समोर आले आहेत.

रियलमी 3 प्रो संबधीत एक बातमी इंडियाशॉप्स नावाच्या वेबसाइट ने लिहिली आहे. या वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि त्यांच्याकडे रियलमी 3 प्रो चे लॉन्चच्या आधीच या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती आली आहे. रियलमी 3 प्रो बाजारात कधी लॉन्च होईल हे वेबसाइटच्या रिपोर्ट मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही पण असा अंदाज लावला जात आहे कि रियलमी 3 प्रो एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात 21 तारखेनंतर येऊ शकतो.

रियलमी 3 प्रो स्पेसिफिकेशन्स
रियलमी 3 प्रो बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. रियलमी 3 प्रो च्या सर्वात छोट्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाईल. फोनचा दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच रियलमी 3 प्रो च्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम असेल तसेच हा वेरिएंट पण 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा: Oppo Reno ची लॉन्च डेट झाली निश्चित, 10X झूम, ट्रिपल कॅमेरा आणि 5G सह होईल सादर

रिपोर्ट नुसार रियलमी 3 प्रो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. हा चिपसेट 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला असेल जो आक्टा-कोर प्रोसेसर सह चालेल. लीकनुसार रियलमी 3 प्रो डुअल रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च केला जाईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि रियलमी 3 प्रो चा एक बॅक कॅमेरा सोनी आईएमएक्स519 सेंसर सह येईल. तसेच रियलमी 3 प्रो बद्दल सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण दिली जाईल.

विशेष म्हणजे रियलमी 3 प्रो भारताच्या ब्यूरो ऑफ इंडियन स्टँन्डर्ड (बीआईएस) वेबसाइट वर पण लिस्ट केला गेला आहे. या वेबसाइट वर रियलमी 3 प्रो आरएमएक्स1851 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी रियलमी 3 प्रो थाईलँडच्या एनबीटीसी वेबसाइट वर पण याच मॉडेल नंबर म्हणजे आरएमएक्स1851 सह लिस्ट झाला होता. या दोन्ही लिस्टिंग वरून स्पष्ट झाले कि या महिन्यात रियलमीचा नवीन फोन पण टेक मंचावर लॉन्च होईल.

रियलमी 3
जाताजाता भारतात हिट झालेल्या रियलमी 3 च्या वेरिएंट्स आणि किंमतीची माहिती देतो कि भारतात हा फोन 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता रियलमी 3 चा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here