Home बातम्या फक्त अर्ध्या किंमतीत मिळेल Zee5 Premium चे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन, अश्याप्रकारे मिळवा ऑफरचा फायदा

फक्त अर्ध्या किंमतीत मिळेल Zee5 Premium चे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन, अश्याप्रकारे मिळवा ऑफरचा फायदा

Image: Bloomberg

इंडियन ओवर-द-टॉप (OTT) मार्केट मध्ये वेगाने आपले स्थान मजबूत करणाऱ्या देशी OTT कंपनी Zee5 ने एक शानदार ऑफरची घोषणा केली आहे. कंपनी अर्ध्या किंमतीत जी5 प्रीमियमचे वार्षिक सब्सक्रिप्शन देत आहे. या ऑफरची घोषणा ओटीटी प्लॅटफॉर्मला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून करण्यात आली आहे. कंपनीने सांगितले आहे कि ग्राहक Zee5 प्रीमियमचे वार्षिक सब्सक्रिप्शन फक्त 50 टक्के किंमत देऊन खरेदी करू शकतात.

डिस्काउंट नंतर किंमत

जी5 प्रीमियमच्या वार्षिक सब्सक्रिप्शनबद्दल बोलायचे तर याची किंमत 999 रुपये आहे. कंपनी वार्षिक प्लान 50 टक्के डिस्कॉउंटसह 499 रुपयांमध्ये देत आहे. लक्षात असू दे कि हि ऑफर फक्त 28 फेब्रुवारी पर्यंत वैध आहे.

हे देखील वाचा : Motorola चा मोठा डाव, लॉन्च केले लो बजेट वाले Moto G10 आणि G30 स्मार्टफोन

कंपनी वार्षिक सब्सक्रिप्शन व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्लानवर डिस्काउंट देत नाही. याचा अर्थ असा कि हा प्लान्स आधीप्रमाणे असले पण जर तुम्ही वार्षिक प्लान घेतला तर याची किंमत अर्धी झाली आहे.

एकूण तीन प्लान

वार्षिक प्लान व्यतिरिक्त Zee5 Premium कडे अजून दोन प्लान आहेत, ज्यात मासिक प्लानची किंमत 99 रुपये आणि त्रैमासिक प्लानची किंमत 299 रुपये आहे.

हे देखील वाचा : Samsung चा मास्टरस्ट्रोक, लॉन्च केला 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम असलेला स्वस्त Galaxy A12

परदेशी ओटीटी प्लॅटफॉर्म्सना आव्हान

जी5 वर काही दिवसांपासून असा कंटेंट सादर केला जात आहे ज्यामुळे थेट परदेशी ओटीटी ओरीजनल चित्रपटांना टक्कर मिळत आहे. 2020 मध्ये जी5 वर ‘चिंटू का बर्थडे’, ‘चुड़ैल्स’, ‘तैश’, ‘स्टेट ऑफ सीज: 26/11’ सारखा कंटेंट सादर करण्यात आला होता.

नवीन चित्रपटांव्यतिरिक्त जी5 प्रीमियम मेंबर्स ALT Balaji चे सर्व शोज, जिंदगी टीव्ही शो, लाइव टीव्ही, किड्स आणि टीव्ही शो टेलीकास्टच्या आधी ऍक्सेस करू शकतात. Zee5 प्रीमियम मेंबर्स एकावेळी पाच डिवाइसवर कंटेंट बघू शकतात. म्हणजे एक सब्सक्रिप्शन घेतल्यावर 5 लोक हा ऍक्सेस करू शकतात.