Samsung चा मास्टरस्ट्रोक, लॉन्च केला 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम असलेला स्वस्त Galaxy A12

91मोबाईल्सने सोमवारी Samsung Galaxy A12 च्या भारतीय किंमतचा खुलासा केला होता. आता कंपनीने पुन्हा एकदा आमची बातमी योग्य ठरवत Galaxy A-सीरीजचा लेटेस्ट फोन गॅलेक्सी ए12 12,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला आहे. भारताच्याआधी हा फोन इतर मार्केट्स मध्ये लॉन्च झाला आहे.

डिजाइन

Samsung Galaxy A12 स्मार्टफोन कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिजाईनवर लॉन्च केला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो डावीकडे चौरस आकारात आहे. या सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन इम्बेडेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लोवर पॅनलवर यूएसबी पोर्ट आणि 3.5एमएम जॅक आहे.

कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A12 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 120Hz डिस्प्ले असलेल्या Realme Narzo 30 5G सीरीजच्या लॉन्च डेटचा झाला खुलासा, जाणून घ्या कधी करेल भारतात एंट्री

बॅटरी

Samsung Galaxy A12 मध्ये पावर बॅकअपसाठी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोन डुअल सिम सपोर्टसह येतो जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

डिस्प्ले

Samsung Galaxy A12 कंपनीने 720 x 1500 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. तसेच फोन डिस्प्ले 720×1,600 पिक्सेल आणि 20:9 आस्पेक्ट रेश्योसह चालतो.

प्रोसेसर

गॅलेक्सी ए12 स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेटसह भारतीय बाजारात येईल. फोन मध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेजसह 4GB रॅम + 128GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. युजर्स माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येते.

हे देखील वाचा : Motorola चा मोठा डाव, लॉन्च केले लो बजेट वाले Moto G10 आणि G30 स्मार्टफोन

किंमत

Samsung Galaxy A12 चा बेस वेरिएंट 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरीएंट 12,999, 4GB रॅम + 128GB स्टोरेज ऑप्शन 13,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. फोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट कलर ऑप्शन मध्ये येतो. हा 17 फेब्रुवारीपासून रिटेल स्टोर्स, Samsung.com आणि प्रमुख ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here