Home बातम्या काही दिवस शिल्लक! रेडमीच्या नाकात दम करण्यासाठी मोटोरोला सज्ज; भारतात येतोय स्वस्त Moto G62 5G

काही दिवस शिल्लक! रेडमीच्या नाकात दम करण्यासाठी मोटोरोला सज्ज; भारतात येतोय स्वस्त Moto G62 5G

Motorola उद्या म्हणजे 9 ऑगस्टला Moto G32 स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. हा मोबाईल फोन 50एमपी कॅमेरा, 5,000एमएएच बॅटरी आणि क्वॉलकॉम चिपसेटसह भारतीय बाजारात सादर होईल. मोटो जी32 च्या भारतीय लाँचच्या एक दिवस आधीच कंपनी सांगितलं आहे की मोटो जी सीरीजमध्ये Moto G62 5G Phone देखील 11 ऑगस्टला भारतात लाँच होईल. शॉपिंग साइट Flipkart वर मोटो जी62 5जी फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आहे.

Moto G62 5G India Launch

मोटोरोला मोटो जी62 5जी फोन येत्या 11 ऑगस्टला भारतात लाँच केला जाईल. या फोनच प्रोडक्ट पेज शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाइव् करण्यात आलं आहे जिथे फोनचे फुल स्पेसिफिकेशन्स व डिटेल्स शेयर करण्यात आले आहेत. 11 ऑगस्ट दुपारी फोनची किंमत घोषित करण्यात येईल. मोटो जी62 5जीची विक्री याच ई-कॉमर्स साइटवरून केली जाईल.

Moto G62 5G चे स्पेसिफिकेशन्स /h2>

Motorola Moto G62 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा IPS Full HD+ डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. मोटोरोलाचा हा फोन Android 12 OS वर आधारित MyuX वर चालतो. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीनं Qualcomm च्या Snapdragon 480 Plus प्रोसेसरचा वापर केला आहे. हे देखील वाचा: अरारारा खतरनाक! 50MP कॅमेरा, 5,000mAh च्या बॅटरीसह स्वस्त आणि मस्त Redmi 10 5G ची एंट्री

Moto G62 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळते. ज्यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेऱ्यासह फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळते. तसेच मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउटमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto G62 5G स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. तसेच यात कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 5G, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.1, GPS, NFC, USB-C पोर्ट आणि ड्युअल स्टीरियो स्पिकर मिळतात. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 20W TurboPower फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. भारतात हा फोन Midnight Gray आणि Frosted Blue कलरमध्ये विकला जाईल. युरोपियन बाजारात हा फोन 200 युरो (सुमारे 17,000 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: ग्राहकांकडून पैसे काढण्यासाठी नवीन सिमचं सोंग? की 4G SIM वरच मिळणार 5G सर्व्हिस?