Xiaomi आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करता असते. कंपनीची रेडमी सीरिज आणि रेडमी नोट सीरिज भारतासह जगभरात लोकप्रिय आहे. कमी किंमतीती शानदार स्पेसिफिकेशन्स देण्यासाठी या सीरिज ओळखल्या जातात. यातील नोट सीरिजमध्ये 5G स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. परंतु रेडमी सीरिजमध्ये 5G चा शिरकाव झाला नाही. परंतु आता रेडमीनं टेक मंचावर आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करत एक नवीन स्मार्टफोन Redmi 10 5G लाँच केला आहे. रेडमी 10 नंबर सीरीजमध्ये जोडण्यात आलेला एक 5G Mobile आहे जो भारतातील रेडमी 10 पेक्षा वेगळा आहे. हा नवीन Redmi 10 5G फोन MediaTek Dimensity 700 सह थायलंड आणि इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. तर भारतातील रेडमी 10 एक 4G Phone आहे आणि Qualcomm Snapdragon 680 चिपसेटला सपोर्ट करतो.
Redmi 10 5G चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी 10 5जी फोन 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा रेडमी फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 13 वर चालतो. तसेच यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह 7एनएम फॅब्रिकेशन्सवर आधारित मीडियाटेकचा डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे, जो एक 5G प्रोसेसर आहे. तसेच ग्राफिक्ससाठी या रेडमी फोनमध्ये माली जी57 जीपीयू देण्यात आला आहे. फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी Redmi 10 5G Phone ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सोबतीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देखील मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Redmi 10 5G स्मार्टफोन 3.5एमएम जॅक सोबतच ड्युअल सिम व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सला देखील सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी रेडमी 10 5जी मध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी मिळते. जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
Redmi 10 5G ची किंमत आणि उपलब्धता
या फोनचे दोन व्हेरिएंट इंडोनेशियात बाजारात आले आहेत. यातील 4GB RAM आणि 128GB स्टोरेजची किंमत IDR 2,699,000 (सुमारे 14,400 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला Redmi 10 5G IDR 2,899,000 (सुमारे 15,500) रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनचे Aurora Green, Chrome Silver आणि Graphite Grey कलर व्हेरिएंट बाजारात आले आहेत. Redmi 10 5G च्या भारतीय लाँच किंवा उपलब्धतेची माहिती मात्र मिळाली नाही.















