ग्राहकांकडून पैसे काढण्यासाठी नवीन सिमचं सोंग? की 4G SIM वरच मिळणार 5G सर्व्हिस?

5G Launch India 1st October PM Narendra Modi Airtel Jio Vi 5G Sim 5G Recharge Plan Price

भारतात 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची सांगता झाली आहे आणि आता देश 5G सर्व्हिससाठी तयार आहे. 15 ऑगस्टला या सर्व्हिस बाबत मोठी घोषणा केली जाऊ शकते आणि त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत 5G सर्व्हिस देशात येऊ शकते. परंतु युजर्स पुढे मोठा प्रश्न असा आहे की 4G SIM वरच 5G सर्व्हिस दिली जाऊ शकते की नवीन SIM ची आवश्यकत असेल? त्यामुळे 91मोबाईल्सच्या टीमनं यावर देशातील मोठ्या इंजिनियर्सकडून माहिती घेतली आणि जे समोर आलं तर धक्कादायक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं आहे की जेव्हा जेव्हा सर्व्हिस बदलली आहे तेव्हा तेव्हा नेटवर्क ऑपरेटर्स युजर्सना नवीन SIM घ्यायला भाग पडतात. परंतु वास्तव वेगळंच आहे.

2G नंतर 3G साठी देखील आलं होतं नवीन SIM

4G सिमवर 5G सर्व्हिस मिळेल की नाही हे जाणून घेण्याआधी टेलिकॉम विश्वाचा इतिहास पाहूया. भारतात मोबाईल सर्व्हिस 2G सह सुरु झाली होती. परंतु 2008 मध्ये MTNL नं 3G ची सुरुवात केली होती. त्यानंतर BSNL ची 3G सर्व्हिस आली आणि 2011 मध्ये Airtel, Vodafone आणि IDEA ची एंट्री झाली. यात महत्वाची बाब म्हणजे जेव्हा सर्व्हिस सुरु झाली तेव्हा नेटवर्क ऑपरेटर्सनी युजर्सना 3G सेवेसाठी नवीन SIM घेण्यास सांगितलं आणि जुन्या SIM वरील सर्व्हिस बंद केली.

4G सोबत देखील तेच झालं

3G नंतर जेव्हा 4G सर्व्हिस आली आणि Airtel, Vodafone आणि Idea सारख्या कंपन्यांनी जेव्हा आपली सेवा सुरु केली तेव्हा देखील युजर्सना नवीन सिम घेण्याची सूचना करण्यात आली आहे. जुन्या सिमवर ही सर्व्हिस मिळणार नाही असं सांगण्यात आलं. Jio नं सुरुवातच 4G पासून केल्यामुळे त्यासाठी नवीन सिमची आवश्यकता होतीच. आता वेळ आहे 5जी सर्व्हिसची आणि पुन्हा प्रश्न येतो की 4G सिमवर 5G सर्व्हिस दिली जाईल की नवीन SIM घ्यावं लागेल?

4G सिमवरचं मिळेल का 4G सर्व्हिस

या प्रश्नाचं धक्कादायक उत्तर आम्हाला मिळालं आहे. स्पष्ट सांगायचं तर 5G सर्व्हिससाठी नवीन सिमची आवश्यकता नाही. 4G सिमवर देखील 5G सर्व्हिस दिली जाऊ शकते. परंतु हे ऑपरेटरवर अवलंबून असेल की युजर्सना या सिमवर नवीन सर्व्हिस द्यावी की नवीन सिम घेण्यासाठी दबाव टाकावा.

याबाबत भारतातील प्रसिद्ध इंजीनियर अर्शदीप सिंह निप्पी यांनी आम्हाला सांगितलं की “4G सिमवर 5G सर्व्हिस दिली जाऊ शकते जर सिम फ्युचर रेडी असेल. यासाठी नवीन सिमची गरज नसेल. जर सिम फ्यूचर रेडी नसेल तर ऑपरेटर्स ओटीए अपडेट देऊन 4G सिम 5G साठी अपग्रेड करू शकतात.”

त्यांनी पुढे सांगितलं की “सिम कोणतंही असलं तर ते फक्त आयडेंटिटी नंबर म्हणजे ऑपरेटरसाठी तुमची ओळख पटवून देणारा नंबर नंबर आहे. सिममध्ये कोणतीही मोठी टेक्नॉलॉजी नसते. जर सिममध्ये 3G, 4G किंवा 5G ची टेक्नॉलॉजी असती तर सिम नसणारे फोन कसं काम करत आहेत. तुम्ही पाहिलं असेल की भारतात अनेक फोनमध्ये e-SIM ची सर्व्हिस आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. ई-सिम असलेले फोन 2G, 3G, 4G आणि 5G प्रत्येक नेटवर्कवर काम करत आहेत. तुम्ही सांगू शकाल का कसं? वास्तवात सिम फक्त आयडेंटिटी नंबर आहे आणि नेटवर्क सपोर्ट फोनमध्ये असतो. त्यामुळे 4G काय तर 3G सिमवर देखील 5G सर्व्हिस वापरता येऊ शकते.’’

त्यांनी सांगितलं की, “आधी सिम सोबत टूलकिट येत असे ज्यामुळे ते कोणत्याही नेटवर्कवर सहज अपग्रेड करता येत होतं. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ते आता हटवण्यात आलं आहे. तरीही ऑपरेटर्सना 2G, 3G किंवा 4G सिमवर 5G सर्व्हिस देताना जास्त त्रास होणार नाही फोनमध्ये फक्त नेटवर्क बँडचा सपोर्ट असणं आवश्यक आहे.”

ऑपरेटरचा हेतू काय आहे

अर्शदीप सिंह यांच्या बोलण्यावरून समजलं की 4G सिमवर आरामात 5G सर्व्हिस दिली जाऊ शकते. परंतु यह ऑपरेटर्सच्या हेतूवर अवलंबुन असेल. आतापर्यंत त्यांनी युजर्सना फक्त अंधारात ठेवलं आहे. कारण तुम्ही देखील पाहिलं असेल की, Apple iPhone आणि Samsung सह अनेक कंपन्यांच्या फोनमध्ये e-SIM ची सर्व्हिस आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. सिमविना देखील ते फोन 2G, 3G, 4G आणि 5G प्रत्येक प्रकारच्या नेटवर्कला सपोर्ट करतात परंतु दुसरीकडे दरवेळी नेटवर्क अपग्रेडनंतर युजर्सना नवीन सिम घेण्यास सांगितलं जातं.

त्यामागे कारण स्पष्ट आहे, पैसे मिळवणं. जर एक युजरकडून सिमच्या नावावर 25 रुपये देखील मिळाले तर 30 कोटी आणि 40 कोटी युजर्सकडून एकाचवेळी किती पैसे येतील. यात वेळ आणि पैसे युजरचे जातील तर ऑपरेटर्सना फायदाच होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here