टेक्नोनं काही दिवसांपूर्वी भारतात आपला बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Tecno Spark 8P स्मार्टफोन लाँच केला होता. टेक्नो स्पार्क 8पी 50MP Camera असलेल्या भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स पैकी एक आहे. आता असाच एक विक्रम कंपनीच्या नव्या स्मार्टफोननं केला आहे. Tecno नं आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Tecno Spark 9 भारतात लाँच केला आहे. याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि इतक्या कमी किंमतीत येणारा हा पहिला स्मार्टफोन आहे ज्यात 11GB रॅम देण्यात आला आहे. टेक्नोचा हा दमदार बजेट स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India च्या माध्यमातून ग्राहकांना विकत घेता येईल. Tecno Spark 9 स्मार्टफोनचे काही प्रमुख स्पेसिफिकेशन्स पाहता फोनमध्ये Mediatek Helio G37 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला टेक्नोच्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.
Tecno Spark 9 चे स्पेसिफिकेशन्स
- 6.6-इंच HD+ 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले
- Mediatek Helio G37 प्रोसेसर
- 11GB रॅम, 128GB स्टोरेज
- 5,000mAh बॅटरी
- 13MP AI ड्युअल रियर कॅमेरा
- Android 12
Tecno Spark 9 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं यात वॉटरड्रॉप नॉच डिजाईन दिली आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा फिट करण्यात आला आहे. फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे टेक्नोच्या या फोनमध्ये 6GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे एकूण 11GB रॅमची ताकद आवश्यकता असेल तेव्हा मिळवता येते. तसेच फोनमध्ये 128GB ची स्टोरेज मिळते. टेक्नोच्या या फोनमध्ये Mediatek Helio G37 ऑक्टा कोर प्रोसेसर मिळतो. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची झोप उडणार! 10 हजारांच्या आत देखील 5G; स्वस्त Samsung Galaxy A04s मध्ये 5G नेटवर्क
कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Tecno Spark 9 फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13MP चा मुख्य सेन्सर आणि सेकंडरी AI कॅमेरा आहे. रियर पॅनलवरील कॅमेरा मॉड्यूलमध्ये LED फ्लॅश देखील मिळतो. तसेच फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या नव्या टेक्नो फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. टेक्नोचा हा फोन लेटेस्ट Android 12 वर चालतो.
Tecno Spark 9 ची किंमत
Tecno Spark 9 स्मार्टफोनचा भारतात एकच व्हेरिएंट दाखल झाला आहे, ज्याची किंमत कंपनीनं 9499 रुपये ठेवली आहे. परंतु कंपनीनं लाँच ऑफरची देखील घोषणा केली आहे. त्यामुळे मर्यादित कालावधीसाठी हा 1000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. त्यामुळे Tecno Spark 9 स्मार्टफोनच्या पहिल्या सेलमध्ये हा फोन फक्त 8499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा स्मार्टफोन 23 जुलैपासून अॅमेझॉनवर सुरु होणाऱ्या प्राईम डे सेलमध्ये ग्राहकांच्या भेटीला येईल. हे देखील वाचा: 125W सुपर फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅम असलेल्या iQOO 9T 5G बाबत मोठा खुलासा
