रेडमी-रियलमीची झोप उडणार! 10 हजारांच्या आत देखील 5G; स्वस्त Samsung Galaxy A04s मध्ये 5G नेटवर्क

Samsung च्या 5G स्ट्रॅटेजीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आम्हाला मिलेल्या बातमीनुसार कंपनी आपल्या स्वस्त स्मार्टफोन्समध्ये देखील 5G देणार आहे आणि या मालिकेत पाहिलं नाव Samsung Galaxy A04s 5G चं असेल. गेल्या महिन्यात हा फोन सर्टिफिकेशन साइट गीकबेंचवर स्पॉट झाला होता जिथून काही स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली होती. लिस्ट झालेला फोन सॅमसंगच्या Exynos 850 Processor सह लिस्ट करण्यात आला होता जो एक 4G प्रोसेसर आहे परंतु आम्हाला इंडस्ट्री सोर्सकडून बातमी मिळाली आहे की कंपनी Samsung Galaxy A04s 5G व्हेरिएंट भारतात लाँच करण्याची योजना बनवत आहे. ही माहिती अशा सोर्सकडून मिळाली आहे जे सॅमसंगसोबत गेले अनेक वर्ष काम करत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 91मोबाईल्सला अनेकदा एक्सक्लूसिव्ह माहिती दिली आहे जी अचूक सिद्ध झाली आहे.

त्यांनी आम्हाला सांगितलं की, कंपनी आपल्या 5G स्ट्रॅटेजीबाबत खूप आक्रमक झाली आहे आणि 10-11 हजार रुपयांच्या फोनमध्ये देखील 5G आणण्याची योजना बनवत आहे, ज्याची सुरुवात Galaxy A04s पासून केली जाईल. 4G व्हेरिएंटबाबत बोलायचे तर Galaxy M13 प्रमाणे Galaxy A04s देखील दोन मॉडेलमध्ये येण्याची शक्यता आहे किंवा गिकबेंचवरील 4G व्हेरिएंट दुसऱ्या देशांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तुम्हाला माहित असेल की सॅमसंगची भारतात जगातील सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे आणि इथे बनवण्यात आलेले फोन बाहेरच्या देशांमध्ये निर्यात देखील होतात. खास करून स्वस्त स्मार्टफोन आता भारतात बनून दुसऱ्या देशांमध्ये पाठवले जाऊ लागले आहेत. त्यामुळे आशा आहे की Galaxy A04s च्या 5G सह कंपनी 4G मॉडेल देखील सादर करेल आणि 4G मॉडेल इथून निर्यात केला जाईल.

त्यांनी फोनच्या लाँच टाइमबाबत देखील माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की सध्या हा फोन टेस्टिंग फेजमध्ये आहे. त्यामुळे लाँच होण्यासाठी कमीत कमी दोन महिने जाऊ शकतात. कंपनी हा हँडसेट सप्टेंबरनंतरच सादर करेल. याआधी आलेला गॅलेक्सी ए03एस मॉडेल देखील 2021 मध्ये ऑगस्टमध्ये भारतात लाँच झाला होता. परंतु यावेळी स्थिती थोडी वेगळी आहेै. 26 जुलैपासून भारतात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव आहे आणि 15 ऑगस्टला या सर्व्हिसबाबत घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे कंपनी कदाचित भारतात 5G सर्व्हिस लाँच झाल्यानंतरच हा फोन सादर करेल.

Samsung Galaxy A04s ची डिजाइन

काही दिवसांपूर्वीच Samsung Galaxy A04s चे रेंडर लीक करण्यात आले होते त्यामुळे फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. फोन की बॉडी पॉलिकार्बोनेट की बनी आहे आणि यात तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. फोनची डिजाइन गॅलेक्सी एम13 सारखी आहे आणि यात देखील तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच साईड पॅनलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात येईल. फ्रंटला तुम्हाला वॉटरड्रॉप नॉच मिळेल. तसेच फोनमध्ये USB Type-C आणि 3.5 एमएम ऑडियो जॅक देखील मिळेल.

Samsung Galaxy A04s चे संभाव्य स्पेसिफिकेशन

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy A04 स्मार्टफोनमध्ये Exynos 850 प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये तुम्हाला 3GB रॅमसह 64GB मेमरी मिळू शकते. 5G व्हेरिएंटमध्ये तुम्हाला वेगळा प्रोसेसर मिळेल. हा फोन अँड्रॉइड 12 बेस्ड असेल आणि यात सॅमसंगच्या वन युआयची लेयरिंग दिली जाऊ शकते. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. मिलेल्या माहितीनुसार यातील मेन कॅमेरा 13MP चा असू शकतो. सध्यातरी बॅटरी आणि स्क्रीन बाबत जास्त माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here