Home बातम्या 13 एप्रिलला भारतात लाँच होईल पावरफुल गेमिंग फोन Asus ROG Phone 7

13 एप्रिलला भारतात लाँच होईल पावरफुल गेमिंग फोन Asus ROG Phone 7

Asus ROG Phone 6D

गेमिंग फोनचा विषय निघताच असूसच्या आरओजी सीरीजचं नाव सर्वप्रथम येतं. कंपनी आपल्या या सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन Asus ROG Phone 7 भारतात आणणार आहे. आरओजी फोन 7 13 एप्रिलला भारतात लाँच होईल. ROG म्हणजे Republic of Gamers, नावावरून समजतं की हा स्मार्टफोन गेमिंगसाठी किती खास असेल. कंपनीनं या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स मात्र सांगितले नाहीत परंतु लीक्समधून बरीच माहिती समोर आली आहे जी तुम्ही पुढे वाचू शकता.

असूस आरओजी फोन 7 च्या लाँचची माहिती

असूस इंडियानं ऑफिशियल घोषणा करून सांगितलं आहे की कंपनीचा आगामी गेमिंग मोबाइल फोन Asus ROG Phone 7 13 एप्रिलला भारतात लाँच केला जाईल. या दिवशी संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी फोन जगासमोर ठेवला जाईल आणि याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती दिली जाईल. 13 एप्रिलला आरओजी फोन 7 ग्लोबली लाँच होईल अशी अपेक्षा आहे जो भारतासह ताईपे, बर्लिन आणि न्यूयार्कमध्ये देखील एंट्री करू शकतो. हे देखील वाचा: 28,999 रुपयांमध्ये येऊ शकतो 6GB RAM असलेला Samsung Galaxy A34 5G फोन, आमच्या हाती लागली माहिती

असूस आरओजी फोन 7 चे लीक स्पेसिफिकेशन्स

Asus ROG Phone 7 संबंधित लीक्स व रिपोर्ट्सनुसार हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा आतापर्यंतच्या सर्वात पावरफुल मोबाइल प्रोसेसर पैकी एक आहे जो 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे. असूस आपला नवीन फोन 16जीबी रॅमसह मार्केटमध्ये सादर करू शकते जो LPDDR5X RAM आणि UFS 4.0 storage टेक्नॉलॉजीवर काम करू शकतो.

हा आरओजी फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएससह मार्केटमध्ये येऊ शकतो. तसेच ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 740 जीपीयू मिळू शकतो जो गेमिंग दरम्यान स्मूद व वायब्रेंट मोशन देऊ शकतो. पावर बॅकअप पाहता समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार या मोबाइल फोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच फोनमध्ये 65वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते. हे देखील वाचा: 6,000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Samsung Galaxy F14 5G ची एंट्री; किंमत 12,990 रुपये

Asus ROG Phone 7 बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनू शकते जी जो 165हर्ट्जच्या हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकते. हा रिफ्रेश रेट हाय ग्राफिक्स रेसिंग गेमला शानदार व्हिज्युअल क्वॉलिटी देऊ शकतो.