13,499 रुपयांमध्ये लाँच होईल Samsung Galaxy M15 5G फोन! लाँचच्या आधी लीक झाली किंमत

Samsung ने काही दिवसांपूर्वी आपला नवीन स्मार्टफोन Galaxy M15 5G जागतिक मार्केटमध्ये सादर केला आहे. 6,000mAh Battery आणि 50MP Rear Camera ची ताकद असलेला हा मोबाईल आता लवकरच भारतीय बाजारात पण विकला जाणार आहे. कंपनीने परंतु सध्या कोणतीही लाँचच्या तारखेची घोषणा केलेली नाही, लीकमध्ये लाँचच्या आधी ही गॅलेक्सी एम15 ची भारतातील किंमत समोर आली आहे.

Samsung Galaxy M15 5G price in India (लीक)

4GB RAM + 128GB Storage = ₹13,499
6GB RAM + 128GB Storage = ₹14,999

सॅमसंग गॅलेक्सी एम15 5जी फोनची भारतातील किंमत टिपस्टर सुधांशूने शेअर केली आहे. लीकमध्ये दावा करण्यात आला आहे की हा स्मार्टफोन 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमच्या दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल, ज्यामध्ये 128 जीबी स्टोरेज असेल. टिपस्टरनुसार फोनच्या 4 जीबी रॅमची किंमत 13,499 रुपये तसेच 6 जीबी रॅमची किंमत 14,999 रुपये असणार आहे.

Samsung Galaxy M15 5G स्पेसिफिकेशन (जागतिक)

  • 6.5″ 90Hz AMOLED Display
  • MediaTek Dimensity 6100+
  • 50MP Triple Rear Camera
  • 13MP Selfie Camera
  • 6GB RAM + 128GB Storage
  • 25W 6,000mAh Battery

डिस्प्ले : सॅमसंग गॅलेक्सी एम15 5जी फोनला 1080 x 2340​ पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच करण्यात आले आहे. ही स्क्रीन सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.

परफॉर्मन्स : Samsung Galaxy M15 5G फोनमध्ये 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. लीकमध्ये सांगण्यात आले आहे की हा मोबाईल फोन मीडियाटेक डाइमेंसिटी 6100+ चिपसेटसह भारतात विकला जाणार आहे.

मेमरी : कंपनीच्या वेबसाईटवर हा सॅमसंग स्मार्टफोन 4 जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे. तसेच मोबाईलमध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. हा मोबाईल फोन 1 टीबी मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतो. या गोष्टीची अपेक्षा आहे की भारतीय बाजारात गॅलेक्सी एम15 5जी एकापेक्षा अधिक व्हेरिएंट्समध्ये येईल.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी एम15 5जी फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल मेन सेन्सर देण्यात आले आहे. ज्यासोबत 5 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सर तसेच 2 मेगापिक्सल थर्ड लेन्स आहे. तसेच सेल्फी काढणे व रिल्स बनविण्यासाठी या सॅमसंग फोनमध्ये 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी : Samsung Galaxy M15 5G फोन मोठ्या बॅटरीसह आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त 6,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की फुल चार्ज केल्यानंतर या मोबाईलवर 25 तासपर्यंत व्हिडिओ पाहिला जाऊ शकतो.

इतर फिचर्स : या सॅमसंग एम 15 5 जी फोनमध्ये NFC, Bluetooth v5.3, 5GHz Wi-Fi, USB Type-C 2.0 आणि 3.5mm जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here