Xiaomi Redmi Note 7 Pro मिळत आहे 2,000 रुपये स्वस्त, जाणून घ्या कुठे आणि कसा मिळेल फायदा

नुकतेच फेस्टिवल सीजनमुळे Amazon व Flipkart सारख्या शॉपिंग साइट्सवर सेल आयोजित करण्यात आला होता. या सेल मध्ये अनेक ब्रँडसचे स्मार्टफोन्स आर्कषक आफर आणि डिस्काउंट सह सेलसाठी उपलब्ध झाले होते. अलीकडेच भारतातील बेस्ट सेलिंग स्मार्टफोन म्हणून उदयास आलेला Xiaomi Redmi Note 7 Pro पण या सेल मध्ये मिळत होता आणि प्राइज कट सह फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होता. तर आता आपल्या फॅन्सना खुश करत Xiaomi ने पुन्हा Redmi Note 7 Pro ची किंमत कमी केली आहे आणि आता कोणत्याही सेलविना पण हा स्मार्टफोन स्वस्तात विकत घेता येईल.

Xiaomi Redmi Note 7 Pro कंपनी द्वारा मी डॉट कॉम आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर स्वस्तात विकला जात आहे. कंपनीने फोनच्या सर्व वेरीएंट्सच्या किंमती कमी केल्यात आहेत. कंपनीने 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला Redmi Note 7 Pro चा 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरीएंट आता फक्त 11,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. त्याचप्रमाणे 15,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरीएंट आता 13,999 रुपयांमध्ये आणि 16,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला 6 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरीएंट आता फक्त 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

डिजाईन

Redmi Note 7 Pro ग्लॉस बॉडी वर बनवण्यात आला आहे ज्याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केले गेले आहेत. या फोन मध्ये 19.9:5 आस्पेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. Redmi Note 7 Pro मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी शाओमी ने यात गोरिल्ला ग्लास 5 दिली आहे.

Redmi Note 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

शाओमी Redmi Note 7 Pro चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने Redmi Note 7 Pro चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःच अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi Note 7 Pro एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे ज्याचा वापर कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह शानदार होतो. प्रोसेसिंग साठी Redmi Note 7 Pro मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. Redmi Note 7 Pro 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

शाओमी Redmi Note 7 Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच Redmi Note 7 Pro फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. Redmi Note 7 Pro मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Redmi Note 7 Pro मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन नेबुला रेड, नेप्चुन ब्लू आणि स्पेस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here