विवो भारतात आपला नवीन स्मार्टफोन आणण्यासाठी तयार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की ते 20 जूनला Vivo Y58 5G फोन भारतात लाँच करतील. ‘वाय’ सीरीजमध्ये जोडला जाणारा हा मोबाईल मिड बजेटमध्ये आणला जाईल जो स्टायलिश लूक सोबतच जबरदस्त स्पेसिफिकेशनला सपोर्ट करेल. विवो वाय 58 5 जी मध्ये 6000 एमएएच बॅटरी तसेच 50 मेगापिक्सल कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनची लाँचची माहिती तसेच लीक स्पेसिफिकेशन तुम्ही पुढे वाचू शकता.
Vivo Y58 5G भारतातील लाँचची तारीख
विवोने अधिकृतपणे घोषणा करत सांगितलं आहे की ते भारतात आपल्या ‘वाय’ सीरीजचा विस्तार करणार आहेत, ज्यानुसार वाय58 5 जी फोन लाँच केला जाईल. हा मोबाईल सॉफ्ट लाँचच्या माध्यमातून बाजारात येईल तसेच Vivo Y58 5G ची किंमत व सेलसह याच्या स्पेसिफिकेशनची माहिती पण या दिवशी दिली जाईल. तसेच हा विवो 5 जी स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साईट तसेच ऑफलाईन रिटेल स्टोर दोन्हीवर सेलसाठी उपलब्ध होईल.
Vivo Y58 5G चे स्पेसिफिकेशन (लीक)
- 6.72″ 120 हर्ट्झ एफएचडी डिस्प्ले
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 3
- 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज
- 8 जीबी एक्सटेंडेड रॅम
- 50 एमपी ड्युअल रिअर कॅमेरा
- 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- 44 वॉट फास्ट चार्जिंग
- 6,000 एमएएच बॅटरी
डिस्प्ले : समोर आलेल्या लीकनुसार विवो वाय58 5जी फोनला 6.72 इंचाच्या फुलएचडी डिस्प्लेवर लाँच केले जाईल. या स्क्रीनवर 120Hz रिफ्रेश रेट तसेच 1024nits ब्राईटनेस पाहायला मिळू शकतो.
प्रोसेसर : Vivo Y58 5G फोन Snapdragon 4 Gen 3 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच होऊ शकतो. हा Qualcomm चा 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मोबाईल चिपसेट आहे जो 2.3GHz क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो.
रॅम स्टोरेज : लीकनुसार विवो वाय 58 5 जी फोन 8 जीबी रॅमवर लाँच होईल. या फोनमध्ये 8GB Extended RAM दिली जाईल जो फिजिकल रॅमसह मिळून याला 16 जीबी रॅमची ताकद प्रदान करेल. तसेच मोबाईलमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज तसेच 1TB मेमरी कार्डला सपोर्ट मिळेल.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी विवो वाय 58 5 जी फोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. याच्या बॅक पॅनलवर 50MP AI Portrait लेन्स तसेच 2 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सर दिली जाईल. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Vivo Y58 5G 8MP Front कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.
बॅटरी : लीकनुसार पावर बॅकअपसाठी Vivo Y58 5G फोनला मोठ्या 6,000mAh बॅटरीवर लाँच केले जाईल. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळेल.
इतर फिचर्स : Vivo Y58 5G फोन IP64 रेटिंगसह लाँच होईल जो याला वॉटर व डस्टप्रूफ बनवितो. या मोबाईलची जाडी 7.99mm तसेच वजन 199 ग्रॅम सांगण्यात आले आहे. लीकनुसार यात 300% ओडियो बूस्टर असणारे ड्युअल स्पिकर्स मिळतील.














