माध्यम वर्गाचे वास्तव दाखवतात ‘या’ वेब सीरीज; घरच्यांसोबत देखील करता येतील ‘बिंज वॉच’

सध्या दर्शक घर बसल्या OTT Platform वर चित्रपट आणि वेब सीरीज बघण्याला पसंती देत आहेत. याच कारणामुळे Netflix, Amazon Prime Video, Hotstar आणि Sony Liv सारख्या अनेक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सतत नवनवीन ओरिजनल Web Series रिलीज होत आहेत. परंतु सर्वच सीरिज कुटुंबासह एंजॉय करता येत नाहीत. आज आम्ही अशा वेब सीरीजची यादी घेऊन आलो आहोत ज्या तुम्ही तुमच्या कुटुंबासह एन्जॉय करू शकता. यात माध्यम वर्गीय कुटुंबातील गमतीजमती दाखवण्यात आल्यात आहेत. त्यामुळे अनेकांना या गोष्टी आपल्या कुटुंबाच्या आहेत असं वाटू शकतं. चला पाहूया 5 शानदार कौटुंबिक वेब सीरीजची यादी.

Gullak

गुल्लकचे आतापर्यंत तीन सीजन आले आहेत आणि तिन्ही सीजन दर्शकांना आवडले आहेत. यात एका माध्यम वर्गातील कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली. आहे ज्यात आई-वडील आणि त्यांची दोन मुलगे आहेत. ही सीरीज तुमच्या आठवणी ताज्या करेल. घरातील गुल्लक प्रमाणेच या सीरीजमध्ये कुटुंबातील प्रत्येक छोटा-मोठा क्षण जपून ठेवण्यात आला आहे. सीरीजचे तिन्ही सीजन Sony Liv वर स्ट्रीम करता येतील आणि या सीरिजचं मराठी व्हर्जन देखील उपलब्ध आहे.

Ye Meri Family

Ye Meri Family चे दोन सीजन आले आहेत, जे सध्या अ‍ॅमेझॉन मिनी टीव्ही, टीव्हीएफ प्ले, नेटफ्लिक्स आणि युट्युबवर उपलब्ध आहेत. सीरीजमध्ये 90 च्या दशकातील उन्हाळ्याच्या सुट्टीची गोष्ट आहे. यात ट्यूशन टीचरचा ओरडा आणि बेस्ट फ्रेंड सोबत आयुष्याचे अविस्मरणीय क्षण दाखवण्यात आले आहेत. ही सीरीज तुमच्या बालपणीच्या आठवणी नक्कीच ताज्या करेल.

Home Shanti

जर तुम्हाला Gullak Season 3 मध्ये मिश्रा परिवाराची गोष्ट आवडली असेल तर काही दिवसांपूर्वी डिज्नी प्लस हॉटस्टारवर आलेल्या ‘होम शांती’ मधील जोशी परिवाराची गोष्ट देखील आवडेल. या वेब सीरीजमध्ये एका माध्यम वर्गातली परिवारासाठी त्यांचं घर किती महत्वाचं असतं हे दाखवण्यात आलं आहे आणि ते बनवण्यासाठी काय काय करावं लागतं हे देखील दिसतं. सीरीजमध्ये सुप्रिया पाठक आणि मनोज पाहवा सारखे कसलेले कलाकार आहेत. हॉटस्टारनं मराठी दर्शकांसाठी डब व्हर्जनची सोय देखील केली आहे.

Home

‘होम’ फ्री मध्ये जियो सिनेमावर बघता येईल. या वेब सीरीजमध्ये एका भारतीय कुटुंबातील सुंदर क्षण दाखवण्यात आले आहेत. जियो सिनेमा व्यतिरिक्त ही सीरीज आल्ट बालाजीवर स्ट्रीम करता येईल. सीरीजमध्ये अन्नू कपूर प्रमुख भुमीकेत आहेत.

The Aam Aadmi Family

या सीरीजच्या नावावरून समजले असेल की ही वेब सीरीज एक आम आदमीच्या कुटुंबावर आधारित आहे. ‘द आम आदमी फॅमिली’ शो आपल्या नावाला पूर्णपणे न्याय देतो. या सीरीजमध्ये मिडिल क्लास फॅमिलीची गोष्ट सुंदररित्या दाखवण्यात आली आहे. सीरीजचे दोन सीजन आले आहेत, जे Zee5 वर बघता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here