एकीकडे वनप्लस 6 यशाचे रेकॉर्ड बनवत आहे तर दुसरीकडे टेक बाजारात वनप्लस 6टी च्या चर्चेला उधाण आले आहे. नुकताच वनप्लस 6टी रशिया च्या यूरोशियन इकोनॉमिक कमीशन (ईईसी) च्या आॅफिशियल वेबसाइट वर दिसला होता. या लिस्टिंग नंतर फोन लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वाढली होती. तसेच आज या फोन संबंधी महत्वाची माहिती समोर आली आहे. वनप्लस 6टी बद्दल समजले आहे की कंपनी हा इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात लॉन्च करेल तसेच हा फोन 17 ऑक्टोबरला टेक बाजारात येऊ शकतो.
वनप्लस 6टी बद्दल ही माहिती स्वतः वनप्लस कंपनी ने दिली आहे. वनप्लस ने एक आॅफिशियल ईमेज शेयर केली आहे ज्यातून फोन मध्ये इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर असल्याची बाब समोर आली आहे. या ईमेज मध्ये डिस्प्ले वर फिंगरप्रिंट सेंसर दाखवण्यात आला आहे. इमेज मध्ये 17 ऑक्टोबर या तारखे सोबत 11 वाजल्याची वेळ लिहिण्यात आली आहे. जरी वनप्लस ने फोन च्या लॉन्च डेट ची कोणतीही घोषणा केली नसली तरी ईमेज बघून बोलले जात आहे की वनप्लस 6टी 17 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता एखाद्या ईवेंट मधून लॉन्च होईल.

वनप्लस 6टी बद्दल आता पर्यंत आलेल्य लीक्स नुसार हा फोन 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो ज्याच्या वरच्या बाजूला नॉच असेल. कंपनी या फोन मध्ये 8जीबी रॅम देऊ शकते. तसेच लीक्स नुसार वनप्लस 6टी 2 स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते.
लीक्स नुसार वनप्लस 6टी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 किंवा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर 3डी डेफ्थ सेंसर वाला डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. तसेच पावर बॅकअप च्या बाबतीत पण वनप्लस 6टी आपल्या आधीच्या मॉडेल पेक्षा एडवांस होईल आणि यात डॅश चार्ज वाली 3,700एमएएच ची बॅटरी मिळू शकते.














