iQOO 11 series लवकरच टेक मंचावर येऊ शकते. कंपनीनं मात्र आतापर्यंत आयकू 11 सीरीजची लाँच डेट आणि यातील मोबाइल फोन्सची माहिती दिली नाही परंतु या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये iQOO 11 आणि iQOO 11 Pro स्मार्टफोन लाँच होणार असल्याची चर्चा टेक वर्तुळात सुरु आहे. विविध लीक्समध्ये या मोबाइल फोन्सचे अनेक स्पेसिफिकेशन्स देखिली समोर आले आहेत तसेच नवीन लीकमध्ये बातमी मिळाली आहे की आयकू 11 स्मार्टफोन 120W fast charging तसेच आयकू 11 प्रो स्मार्टफोन 200W fast charging टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.
iQOO 11 series
आयकू 11 आणि आयकू 11 प्रो दोन्हीचे स्पेसिफिकेशन्स लीकमध्ये शेयर करण्यात आले आहेत. ताज्या लीकमध्ये या दोन्ही मोबाइल फोन्सच्या बॅटरी आणि चार्जिंग कपॅसिटीचा खुलासा झाला आहे त्यानुसार iQOO 11 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. तर दुसरीकडे iQOO 11 Pro स्मार्टफोन 200वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल तसेच या फोनमध्ये 4,700एमएएचची बॅटरी मिळेल. हे देखील वाचा: सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक
iQOO 11 Pro Specifications
आयकू 11 प्रो बद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच केला जाईल तसेच मोबाइल फोनमध्ये 16 जीबी रॅम मिळेल. फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 512जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. लीकनुसार या आयकू मोबाइलमध्ये 6.78 इंचाचा ई6 अॅमोलेड डिस्प्ले दिली जाईल जो पंच होल स्टाइलसह बाजारात येईल आणि क्यूएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल.
फोटोग्राफीसाठी आयकू 11 प्रो स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो ज्यात 50MP Sony IMX866 प्रायमरी सेन्सरसह 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 14.6 मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी iQOO 11 Pro मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: सर्वात शक्तीशाली शाओमी स्मार्टफोनमध्ये असतील 50MP चे कॅमेरे; लाँच पूर्वीच Xiaomi 13 Pro ची माहिती लीक
iQOO 11 Specifications
आयकू 11 पाहता या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा मोठा ई6 अॅमोलेड डिस्प्ले दिली जाईल जो फुलएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 50MP Samsung GN5 प्रायमरी सेन्सरसह 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 13 मेगापिक्सलची पोर्टरेट टेलीफोटो लेन्स मिळू शकते.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
