लाँच पूर्वीच Xiaomi 13 Pro ची माहिती लीक; मिळू शकतात 50MP चे तीन कॅमेरे

Xiaomi 12s Ultra

Xiaomi 13 series सह भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड शाओमी पुन्हा एकदा मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्याची तयारी करत आहे. कंपनी आपल्या नवीन शाओमी 13 सीरीजच्या तयारीला लागली आहे, जी लवकरच बाजारात येऊ शकते. शाओमीनं अजूनतरी या स्मार्टफोन सीरीजबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु लीकनुसार शाओमी 13 सीरीजमध्ये Xiaomi 13, Xiaomi 13 Pro, Xiaomi 13X आणि Xiaomi 13S Ultra स्मार्टफोन लाँच होऊ शकतात.

Xiaomi 13, Xiaomi 13 Pro, Xiaomi 13X आणि Xiaomi 13S Ultra नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये टेक मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतात जे सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होतील. कंपनीकडून आतापर्यंत या मोबाइल फोन्सचे ऑफिशियल डिटेल्स शेयर करण्यात आले नाहीत परंतु ताज्या लीकमध्ये यापैकी एक शाओमी 13 प्रो स्मार्टफोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. टिपस्टर योगेश बरारनं सीरीजच्या फ्लॅगशिप मॉडेल Xiaomi 13 Pro ची माहिती लीक केली आहे. त्यानुसार फोनमध्ये 50MP चे तीन रियर कॅमेरे मिळू शकतात. हे देखील वाचा: पाकिस्तानवरून येत आहेत +92 कोड असलेले Whatsapp कॉल! सावधान, तुमचं बँक अकाऊंट होऊन शकतं रिकामं

Xiaomi 13 Pro Specification

शाओमी 13 प्रो बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन 2के रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या मोठ्या एलटीपीओ डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. ही स्क्रीन ई6 अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेली असू शकते तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. ही स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच डिजाइनवर बनली असू शकते किंवा पंच-होल स्टाइलसह येईल हे स्पष्ट झालं नाही.

Xiaomi 13 Pro स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. जो आतापर्यंतचा सर्वात पावरफुल प्रोसेसर असल्याचं सांगितलं जात आहे जो OnePlus 11 series, Samsung Galaxy S23 series आणि iQOO 11 series मध्ये देखील मिळू शकतो. शाओमी 13 प्रो स्मार्टफोनमध्ये 12 जीबी पर्यंतचा रॅम आणि 512 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

शाओमी 13 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो ज्यात सर्व कॅमेरा सेन्सर 50 मेगापिक्सलचे असू शकतात. लीकनुसार Xiaomi 13 Pro 50MP Sony IMX989 1-inch sensor + 50MP ultrawide camera + 50MP telephoto camera ला सपोर्ट करेल. तर फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: LML Star Electric Scooter Booking: एकही रुपया न देता बुक करा इलेक्ट्रिक स्कूटी, सिंगल चार्जमध्ये मिळेल मोठी रेंज

Xiaomi 13 Pro 5G Phone मध्ये पावर बॅकअपसाठी 4,800एमएएच बॅटरी असू शकते, जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. लीकमध्ये समोर आलेले स्पेसिफिकेशन्स तोपर्यंत खरे म्हणता येणार नाहीत जोवर स्वतः शाओमी कंपनी या डिटेल्सचा खुलासा करत नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here