
रेनो 10 सीरीजची सुरुवात करत आज चिनी ब्रँड ओप्पोनं भारतात तीन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे मोबाइल्स OPPO Reno 10 5G, OPPO Reno 10 Pro 5G आणि OPPO Reno 10 Pro+ 5G नावानं भारतीय बाजारात आले आहेत. प्रो मॉडेल्सची माहिती इथे क्लिक करून वाचू शकता. बेस मॉडेल रेनो 10 5जी प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.
OPPO Reno 10 5G स्पेसिफिकेशन्स
- 6.7″ 120Hz AMOLED Display
- MediaTek Dimensity 7050
- 32MP Selfie Camera
- 64MP+32MP+8MP Rear Camera
- 67W 5,000mAh Battery
- स्क्रीन : ओप्पो रेनो 10 5जी 2412×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन 3डी अॅमोलेड पॅनलवर बनली आहे ज्यात 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 950निट्स ब्राइटनेस आणि 394पीपीआय सारखे फीचर्स मिळतात.
- प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर लाँच झाला आहे जो मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो.
- कॅमेरा : OPPO Reno 10 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.7 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स आणि 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
- बॅटरी : पावर बॅकअपसाठी ओप्पो रेनो 10 5जी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 67W SUPERVOOC 2.0 टेक्नॉलॉजीसह येतो जी काही मिनिटांत फोनची बॅटरी फुल चार्ज करू शकते.
OPPO Reno 10 5G ची किंमत व विक्री
कंपनीनं ओप्पो रेनो 10 5जी फोनची किंमत मात्र सांगितली नाही. येत्या 20 जुलैला संध्याकाळी 7 वाजता फोनच्या किंमतीचा खुलासा शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर केला जाईल. हा ओप्पो मोबाइल Silvery Grey आणि Ice Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.
















