Tecno बनवत आहे नवीन स्मार्टफोन Pova Neo 3, स्पेसिफिकेशन लीक

Highlights

  • फोन गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे.
  • ह्याची फ्रंट डिजाईन देखील समोर आली आहे.
  • हा लो बजेटमध्ये लाँच होऊ शकतो.

टेक्नो संबंधित बातमी आली आहे की कंपनी आपल्या ‘पोवा’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Tecno Pova Neo 3 नावानं लाँच केला जाऊ शकतो. हा मोबाइल फोन गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे ज्यात फोनच्या फोटो सोबतच अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे

Tecno Pova Neo 3 लिस्टिंग

  • गुगल प्ले कंसोलवर हा फोन टेक्नो पोवा नियो 3 नावानं लिस्ट करण्यात आला आहे.
  • इथे फोनमध्ये 4जीबी रॅम असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
  • लिस्टिंगमध्ये टेक्नो फोन अँड्रॉइड 13 ओएससह दाखवण्यात आला आहे.
  • Tecno Pova Neo 3 मध्ये मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट असल्याची माहिती समोर आली आहे.
  • ह्या फोनमध्ये 2x ARM Cortex-A75 (2000MHz) आणि 2x ARM Cortex- A55(1800MHz) प्रोसेसर मिळेल.
  • ग्राफिक्ससाठी टेक्नो पोवा नियो 3 मध्ये एआरएम माली-जी52 जीपीयू असल्याची माहिती लिस्टिंगमध्ये समोर आली आहे.
  • गुगल प्ले कंसोलवर सांगण्यात आलं आहे की ह्या टेक्नो फोनमध्ये 720 x 1640 पिक्सल रिजोल्यूशन असलेली स्क्रीन दिली जाईल जी 320डीपीआयला सपोर्ट करेल.

Tecno Pova Neo 3 लुक व डिजाईन

गुगल प्ले कंसोल लिस्टिंगमध्ये टेक्नो पोवा नियो 3 चा फ्रंट लुक समोर आला आहे. ह्यात फोनचा पंच-होल डिस्प्ले दाखवण्यात आला आहे जो स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी देण्यात आला आहे. ह्याच्या तीन कडा बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत, तर खालच्या बाजूला चिन पार्ट दिसत आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे.

Tecno Pova Neo 2 स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : हा मोबाइल फोन 720 x 1640 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो.
  • ओएस आणि प्रोसेसर : Pova Neo 2 अँड्रॉइड 12 आधारित हायओएस 8.6 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे.
  • रॅम व स्टोरेज : फोनमध्ये 6जीबी पर्यंत रॅम तसेच 128 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी वाढवता देखील येईल.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी टेक्नो पोवा नियो 2 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 16 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 7,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here