Xiaomi Redmi Note 10 Ultra स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन झाले लीक

Redmi Note 10s चा फोटो

शाओमीने अलीकडेच आपली Redmi Note 10 सीरीज सादर केली आहे. रेडमी नोट 10 सीरीजचे आतापर्यंत पाच स्मार्टफोन Redmi Note 10, Redmi Note 10 Pro, Redmi Note 10 Pro Max, Redmi Note 10 5G, आणि Redmi Note 10S लॉन्च केले गेले आहेत. आता कंपनी आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन सीरीजचा नवीन स्मार्टफोन “Redmi Note 10 Ultra” लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कथित Redmi Note 10 Ultra स्मार्टफोन चीनमध्ये शाओमीच्या ऑफिशियल वेबसाइटमध्ये स्पॉट केला गेला आहे. या लिस्टिंगमध्ये शाओमीच्या Redmi Note 10 Ultra स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि रियर डिजाइन समोर आली आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा दिला जाईल जो आयताकृती कॅमेरा मॉड्यूलमध्ये दिला जाईल. शाओमीच्या वेबसाइटवर दिसलेल्या Redmi Note 10 Ultra स्मार्टफोनची डिजाइन पाहता या फोनच्या मागे स्ट्रिप पॅटर्न देण्यात आला आहे. (Xiaomi Redmi Note 10 Ultra specifications leaked online)

Redmi Note 10 Ultra स्पेसिफिकेशन्स (संभावित)

Xiaomi Redmi Note 10 Ultra स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनमध्ये 6.53 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1100 SoC देण्यात आला आहे. Redmi Note 10 Ultra स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. बोलले जात आहे कि रेडमी नोट 10 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिविटी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 25 मेला लॉन्च होईल 6GB RAM, 90Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरी असलेला हा स्वस्त स्मार्टफोन

Redmi Note 10 Ultra

रेडमीचा हा स्मार्टफोन तीन वेरिएंट 6GB रॅम + 128GB स्टोरेज, 8GB रॅम + 128GB स्टोरेज, आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. रेडमीचा हा स्मार्टफोन ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर केला गेला आहे. रेडमीच्या या स्मार्टफोनचे इतर स्पेसिफिकेशन्स समोर आले नाहीत.

हे देखील वाचा : Google Pixel 6 Pro स्मार्टफोनच्या लॉन्चपूर्वी समोर आली डिजाइन, बघा Photos

Redmi Note 10 Ultra स्मार्टफोनची किंमत पाहता या स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 1799 RMB (जवळपास 20,500 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. परंतु शाओमीच्या या स्मार्टफोनच्या इतर वेरिएंट्सच्या किंमती समोर आल्या नाहीत. शाओमीने या स्मार्टफोनबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण असे वाटत आहे कि Xiaomi होम मार्केट चीनमध्ये Redmi Note 10 Ultra, Note 10, आणि Note 10 Pro स्मार्टफोन लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे.

शाओमी रेडमी नोट 10 प्रो मॅक्स व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here