ओप्पोनं आपल्या OPPO F21s Pro सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सादर केले आहेत. यातील एक हँडसेट 4G आहे तर दुसरा 5G. हे फोन्स मिडरेंज सेगमेंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. तर आज ओप्पोनं बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी आपल्या ‘ए’ सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन OPPO A17 लाँच केला आहे. ओप्पो ए17 खूप स्टायलिश लुकसह लाँच झाला आहे ज्यात 50MP Camera, 4GB RAM MediaTek Helio G35 आणि 5,000mAh Battery सारखे शानदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या लेखात आपण OPPO A17 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स पाहणार आहोत.
OPPO A17 Price
OPPO A17 स्मार्टफोन सध्या मलेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. जिथे या हँडसेटचा एकच व्हेरिएंट 4 जीबी रॅम व 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या फोनची प्राइस RM599 आहे जी भारतीय करंसीनुसार 10,500 रुपयांच्या आसपास आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात OPPO A17 स्मार्टफोन Lake Blue आणि Midnight Black कलरमध्ये विकत घेता येईल. फोनच्या भारतीय लाँचची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
OPPO A17 Specifications
ओप्पो ए17 स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाइल असलेल्या या फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. या फोनची जाडी फक्त 8.29 एमएम आहे तर OPPO A17 चे वजन 189 ग्राम आहे. हे देखील वाचा: महागाईचा आणखी एक तडाखा! WhatsApp Calling राहणार नाही Free; ऑडियो व्हिडीओ कॉलसाठी द्यावे लागणार पैसे
OPPO A17 अँड्रॉइड 12 आधारित कलर ओएस 12.1.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे तर ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन आईएमजी जीई8320 जीपीयूला सपोर्ट करतो. 4जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीमुळे या ओप्पो मोबाइलला 8 जीबी रॅम पर्यंतची ताकद मिळते.
फोटोग्राफीसाठी ओप्पो ए17 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला सेकंडरी डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
OPPO A17 एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा ओप्पो मोबाइल 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. आयपीएक्स4 रेटिंग या ओप्पो स्मार्टफोनला पाण्याच्या शिंतोड्यांपासून वाचवू शकते. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीच्या अडचणी वाढल्या; विवोनं लाँच केला 10 हजार रुपयांपेक्षा स्वस्त स्मार्टफोन
