महागाईचा आणखी एक तडाखा! WhatsApp Calling राहणार नाही Free; ऑडियो व्हिडीओ कॉलसाठी द्यावे लागणार पैसे

User Have To Pay For Whatsapp Call According To New Telecommunications Bill

WhatsApp भारतातील पहिल्या क्रमांकाचं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. याची लोकप्रियता इतकी आहे की ‘मेसेज कर’ असं म्हणण्या ऐवजी लोक ‘व्हॉट्सअ‍ॅप कर’ असं म्हणतात. भारतातील जवळपास सर्वच Smartphones मध्ये WhatsApp वापरलं जातं. घरातील प्रत्येक सदस्यांच्या मोबाइल फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप आहे ज्याचा वापर चॅटिंग आणि मीडिया शेयरिंग सोबतच कॉलिंगसाठी मोठ्याप्रमाणावर केला जातो. WhatsApp Calling भारतात नवीन ट्रेंड बनला आहे आणि लोक व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलसह ऑडियो कॉल देखील खूप करतात. परंतु सरकारच्या नवीन Indian Telecommunication Bill 2022 मधून लवकरच Free WhatsApp Call Service बंद होऊ शकते.

फक्त WhatsApp नव्हे तर आता Skype, Zoom, Telegram आणि Google Duo सारख्या अ‍ॅप्सवरून होणाऱ्या कॉलिंगसाठी पैसे द्यावे लागू शकतात. केंद्र सरकार नवीन इंडियन टेलीकम्युनिकेशन बिल 2022 वर काम करत आहे, ज्याच्या ड्राफ्टमध्ये व्हिडीओ कम्युनिकेशन आणि कॉलिंग अ‍ॅप्स विरोधात सरकार कठोर पाऊले उचलणार असं दिसत आहे. जर Indian Telecommunication Bill 2022 पास झालं तर फ्री व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग बंद होईल तसेस सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप कॉलसाठी देखील पैसे द्यावे लागतील. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीच्या अडचणी वाढल्या; विवोनं लाँच केला 10 हजार रुपयांपेक्षा स्वस्त स्मार्टफोन

User Have To Pay For Whatsapp Call According To New Telecommunications Bill

Indian Telecommunication Bill 2022 मध्ये काय आहे

इंडियन टेलीकम्युनिकेशन बिल 2022 च्या ड्राफ्टमध्ये अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे ज्यानुसार भारतात सक्रिय सर्व कॉलिंग आणि मेसेजिंग अ‍ॅप्सना आता आपल्या कॉलिंग सर्व्हिससाठी Jio, Airtel आणि Vi सारख्या टेलीकॉम कंपन्यांप्रमाणे वेगळं लायसन्स घ्यावं लागेल. या लायसन्ससाठी सरकारकडे फी जमा करावी लागेल. परिणामी सरकारला शुल्क दिल्यानंतर हे अ‍ॅप्स आपल्या सेवा मोफत देतील असं वाटत नाही, त्याचा भार युजर्सच्या खिशावर पडेल. हे देखील वाचा: बजेटमध्ये आणखी एक धमाका करण्याची शाओमीची तयारी; Redmi A1 Plus असेल आगामी स्वस्त स्मार्टफोन

User Have To Pay For Whatsapp Call According To New Telecommunications Bill

अ‍ॅप कॉलिंगसाठी द्यावे लागणार पैसे

या बिलमध्ये फक्त मेसेजिंग अ‍ॅप्स नव्हे तर OTT Platforms चा देखील समावेश करण्यात आला आहे. हा ड्राफ्ट बिल 20 ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक सूचनांसाठी खुला करण्यात आला आहे आणि त्यानंतरच बिलवरील प्रतिक्रिया व सूचनांनुसार यात बदल केले जातील आणि हे पास केले जाईल. या बिलच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप, झूम आणि गुगल डुओला टेलीकॉम लायसन्सच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे झाल्यास ग्राहकांना या अ‍ॅप्सवरून कॉलिंग करण्यासाठी वेगळे रिचार्ज प्लॅन अ‍ॅक्टिव्हेट करावे लागू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here