5000mAh बॅटरीसह Vivo Y16 भारतात लाँच; किंमत 12,499 रुपये

Vivo Mobile Vivo Y16 India Launch Price Features Sale Details

Vivo Y16 India Launch: विवोची वाय सीरिज बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी आहे. परंतु ते स्मार्टफोन देखील शानदार डिजाईनसह सादर केले जातात, हे पुन्हा एकदा कंपनीनं सिद्ध केलं आहे. 91मोबाइल्सनं आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की टेक ब्रँड विवो भारतात आपला नवीन मोबाइल फोन Vivo Y16 लाँच करणार आहे आणि भारतात विवो वाय16 प्राइस 12,499 रुपये असेल. आता आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत विवोनं आम्ही सांगितलेल्या किंमतीतच Vivo Y16 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

आम्ही दिलेल्या बातमीनुसार Vivo Y16 स्मार्टफोन लाँच झाला आहे. तसेच या फोनचा त्यापेक्षा स्वस्त व्हेरिएंट देखील कंपनीनं सादर केला आहे. विवो वाय16 स्मार्टफोन 5,000mAh Battery, 13MP Camera, 4GB RAM आणि MediaTek P35 processor सह भारतीयांच्या भेटीला आला आहे ज्याची प्राइस, सेल व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Vivo Y16 Price

विवो वाय16 स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये भारतात लाँच केला गेला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 9,999 रुपये आणि 12,499 रुपये आहे. हा नवीन विवो मोबाइल फोन Drizzling Gold आणि Stellar Black कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: बजेटमध्ये आणखी एक धमाका करण्याची शाओमीची तयारी; Redmi A1 Plus असेल आगामी स्वस्त स्मार्टफोन

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

Vivo Y16 Specifications

विवो वाय16 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 2.5डी कर्व ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आली आहे. या फोनची जाडी 8.19 एमएम आणि वजन 183 ग्राम आहे.

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

Vivo Y16 अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा विवो मोबाइल 3जीबी रॅम व 4जीबी रॅमवर लाँच झाला आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये अनुक्रमे 32जीबी आणि 64जीबी स्टोरेज मिळते. वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 1 जीबी अतिरिक्त रॅमची ताकद मिळवता येईल. तसेच मेमरी वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी हा विवो मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 5G Mobile च्या किंमतीत विकत घ्या इलेक्ट्रिक सायकल; सिंगल चार्जमध्ये 30KM पेक्षा जास्त रेंज

Vivo Y16 India Launch Price 12499 Vivo Mobile Phone

Vivo Y16 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here