Vivo Y28 5G लाँच, फक्त 31 रुपयाच्या ईएमआयवर मिळत आहे हा 5 जी स्मार्टफोन

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने आज भारतीय बाजारात आपला स्वस्त 5G फोन लाँच केला आहे. कंपनीने Vivo Y28 5G नावाने हा फोन 13,999 रुपयांच्या किंमतीत बाजारात आणला आहे. सर्वात खास गोष्ट असू शकते या फोनच्या लाँच सोबतच कंपनीने एक पोस्टर पण जारी केले आहे ज्यात हा दावा केला जात आहे की फोनला तुम्ही फक्त 31 रुपये प्रतिदिन देऊन विकत घेता येईल. 91 मोबाइल्सला ही माहिती सध्या ऑफलाइन स्टोरवरुन मिळाली आहे. चला पुढे तुम्हाला फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देत आहोत.

vivo Y28 5G किंमत आणि ऑफर

  • 4 जीबी + 128 जीबी: 13,999
  • 6 जीबी + 128 जीबी: 15,499
  • 8 जीबी + 128 जीबी: 16,999
  • 31 रुपये प्रतिदिन ईएमआयवर पण उपलब्ध
  • 1,500 रुपये पर्यंतचा कॅश बॅक

Vivo Y28 5G ला कंपनीने 3 रॅम व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. सुरुवाती मॉडेल 4 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरीसह उपलब्ध आहे ज्याची किंमत 13,999 रुपये आहे. तसेच दुसरा मॉडेल 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेल सह येतो आणि हा फोन 15,499 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. याचा सर्वात मोठा व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी सह येतो आणि कंपनीने याची किंमत 16,999 रुपये ठेवली आहे.
जसे की आम्ही तुम्हाला सांगितले की या फोनच्या लाँच सोबत कंपनीने आपल्या नवीन ईएमआय स्कीमची घोषणा केली आहे. तुम्ही फोनला 31 रुपये प्रति दिन ईएमआयवर खरेदी करु शकता आणि त्याचबरोबर 1,500 रुपये कॅशबॅकचा पण दावा करण्यात आला आहे ज्या पोस्टरमध्ये स्पष्ट दिसत आहे.

vivo Y28 5G स्पेसिफिकेशन

  • 6.64 इंचाचा आयपीएस एलसीडी
  • मेन कॅमेरा 50 MP
  • सेकंडरी कॅमेरा 2 MP
  • सेल्फी कॅमेरा 8 MP
  • 5,000 mAh बॅटरी
  • 15 वॉट चार्जर
  • अँड्रॉइड 13 आधारित
  • मीडियाटेक डायमेंसिटी 6020 5G प्रोसेसर

फोनच्या स्पेसिफिकेशन बाबत आतापर्यंत जास्त माहिती आली नाही परतुं आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार या फोनमध्ये 6.64 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी 6020 5 जी प्रोसेसरवर चालतो.
राहिली गोष्ट कॅमेराची तर विवो वाय 28 5जी च्या रिअर पॅनलमध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. फोनचा मेन कॅमेरा 50 एमपीचा आहे तर सेकंडरी कॅमेरा 2 एमपीचा देण्यात आला आहे. फ्रंटला तुम्हाला 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा मिळेल.
फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी आहे आणि हा फोन 15 वॉट के चार्जर सह उपलब्ध होईल. तसेच सिक्योरिटीसाठी यात साइड माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर ​देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 वर चालतो जो फनटच 13 आधारित आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here