लेनोवोच्या अधिकाऱ्यांनी टीज केला Moto X40; सर्वप्रथम होऊ शकते चीनमध्ये एंट्री

Motorola कंपनी आपल्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहे. हा मोटोरोला मोबाइल कंपनीच्या ‘एक्स’ सीरीजमध्ये जोडला जाईल तसेच Moto X40 नावानं लाँच होऊ शकतो. Lenovo executive Chen Jin नं मोटोरोला मोटो एक्स40 स्मार्टफोन ऑफिशियली टीज केला आहे आणि हिंट दिली आहे की हा मोबाइल फोन डिसेंबर 2022 मध्ये बाजारात येऊ शकतो. Moto X40 सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होऊ शकतो नंतर दुसऱ्या देशांमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Moto X40 लाँच

मोटो एक्स40 बद्दल बातमी समोर आली आहे की हा मोबाइल फोन पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. लेनेवो एग्जीक्यूटिव्ह जिन यांनी मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर टीजर ईमेज शेयर केली आहे ज्यात फोनच्या नावाचा आणि लाँचचा खुलासा करण्यात आला आहे. या फोटोमध्ये फोनची झलक देखील दिसते तसेच मोटो एक्स40 ला मोबाइल फोन्सचा SUV असल्याचं सांगण्यात आलं आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की Moto X40 IP68 रेटिंगसह येईल त्यामुळे हा वॉटरप्रूफ बनेल. हे देखील वाचा: अरे वाह! रेडमीचा सर्वात स्वस्त 5G Phone झाला आणखी स्वस्त; डिस्काउंटसह 6GB रॅम आणि 50MP कॅमेरा

Moto X40 चे लीक स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला एक्स40 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स व मीडिया रिपोर्ट्सनुसार हा मोबाइल फोन 1080 × 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या ओएलईडी डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. फोनची स्क्रीन अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. लीकनुसार या मोटोरोला मोबाइलचे डायमेंशन 161.3×73.9×8.5एमएम आणि वजन 196 ग्राम असू शकते.

Moto X40 मध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट असू शकतो. तसेच सर्टिफिकेशन साइट्स व रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की मोटोरोला मोटो एक्स40 18जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो. हा फोनचा सर्वात मोठा मॉडेल असू शकतो, ज्यात 12जीबी रॅम व 8जीबी रॅम देखील दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 512जीबी स्टोरेज, 256जीबी स्टोरेज तसेच 128जीबी स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: My Scheme Portal Online Process: खास तुमच्यासाठी कोणती सरकारी योजना आहे सांगेल ‘ही’ वेबसाइट, आताच करा चेक

फोटोग्राफीसाठी Motorola Moto X40 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 50 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 12 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर दिला जाऊ शकतो जो 4एक्स ऑप्टिकल झूमला सपोर्ट करू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी मोटो एक्स40 मध्ये 4,950एमएएच किंवा 4,450एमएएचची बॅटरी मिळू शकते. चीनमध्ये लाँच झाल्यावर Moto X40 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये Moto Edge 40 Pro नावानं येण्याची शक्यता आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here