मोटोरोला (Motorola) भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीनं Moto G सीरीजमध्ये सादर होणाऱ्या Moto G32 फोनच्या लाँच डेटची माहिती दिली आहे. अधिकृत माहितीनुसार, कंपनी पुढील आठवड्यात एक नवीन Moto G सीरीज स्मार्टफोन लाँच करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. Moto G32 याआधी अनेक सर्टिफिकेशन साईटवर दिसला होता, ज्यातून डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची काही माहिती समोर आली आहे. हा फोन आल्यानंतर कंपनीकडे एकूण 6 जी-सीरीजचे फोन होतील. याआधी G-सीरीजमध्ये Moto G71, Moto G42, Moto G82 5G आणि अनेक फोन लाँच करण्यात आले आहेत.
Moto G32 ची लाँच डेट
मोटोरोला इंडियानं ट्वीटच्या माध्यमातून भारतात नवीन मोटो जी सीरीज स्मार्टफोनच्या लाँचची पुष्टी केली आहे. सोशल मीडियावर देण्यात आलेल्या माहितीनुसार ब्रँड 9 ऑगस्टला भारतात Moto G32 लाँच करेल. तसेच आपल्या पोस्टमध्ये फोनच्या डिजाइन, काही कॅमेरा स्पेक्स आणि अपकमिंग स्मार्टफोनच्या कलर ऑप्शनची माहिती देखील मोटोरोला इंडियानं दिली आहे. भारतात लाँच झाल्यानंतर हा डिवाइस ईकॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Introducing #motog32! A smartphone that elevates your experience and performs like a true all-rounder. Get ready to get #AllYouWant! Launching 9th August on @Flipkart and at leading retail stores. #AllYouWant
— Motorola India (@motorolaindia) August 2, 2022
Moto G32 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
भारतीय लाँचच्या आधी Moto स्मार्टफोन युरोपमध्ये लाँच झाला आहे. Moto G32 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सल आहे. या फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आणि अस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. Moto G32 स्मार्टफोन Snapdragon 680 प्रोसेसरसह बाजारात आला आहे. सोबतीला 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे ज्याच्या मदतीनं स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.
मोटोरोलाच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सल अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा सेन्सर आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. मोटोरोलाचा हा फोन Android 12 आधारित कस्टम युआयवर चालतो.
या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 30W TurboCharge टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. तसेच फेस रिकॉग्नाइजेशन सपोर्टही आहे. या फोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पिकर आणि दोन मायक्रोफोन देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth v5.2, GPS, A-GPS, GLONASS, NFC, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट मिळतो.
Moto G32 ची किंमत
Moto G32 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेजसह येतात. मोटोरोलाचा हा फोन 210 यूरो (सुमारे 16,600 रुपये) च्या प्रारंभिक किंमतीत सादर करण्यात आला आहे. भारतातील अधिकृत किंमतीसाठी 9 ऑगस्टची वाट बघावी लागेल. Moto G32 स्मार्टफोन मिनरल ग्रे, स्टेन सिल्व्हर आणि रोज गोल्ड या तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.