50MP च्या चार कॅमेऱ्यासह लाँच होईल Vivo V40 आणि Vivo V40 Pro, या दिवशी येत आहे भारतात

विवो (Vivo) आपल्या V40 सीरीजचा अगामी फोन Vivo V40 आणि Vivo V40 Pro च्या भारतातील लाँचच्या तारखेवरून पडदा उठविला आहे. कंपनीने अधिकृतपणे माहिती देत सांगितले आहे की दोन्ही मोबाईल फोन 7 ऑगस्टला भारतीय बाजारात येईल. तसेच कंपनीने दोन्ही फोनला आपल्या साईटवर काही स्पेसिफिकेशनसह लिस्ट केले आहे. चला पुढे तुम्हाला 50 मेगापिक्सल असणाऱ्या 4 कॅमेऱ्यासह या फोनच्या माहितीमध्ये समोर आलेली अधिकृत लीकची माहिती देत आहोत.

Vivo V40 आणि Vivo V40 Pro कलर आणि डिझाईन

  • विवो ब्रँड भारतीय अधिकृत साईट आणि सोशल मीडिया साईट एक्स नुसार Vivo V40 आणि Vivo V40 Pro स्मार्टफोन 7 ऑगस्टला दुपारी 12 वाजता लाँच करणार आहे.
  • विवो वी 40 प्रो स्मार्टफोन Ganges Blue सह टायटेनियम ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये सादर होईल. तर विवो वी 40 फोन Ganges Blue, लोटस पर्पल आणि टायटेनियम ग्रे सारखे तीन कलर मध्ये उपलब्ध होईल.
  • दोन्ही फोनची डिझाईन एक सारखी आहे, ज्यात फ्रंटला पंच होल डिस्प्ले आणि मागे वर्टिकल रेट्रेंगल आहे. तसेच कॅमेरा लेन्स व एलईडी फ्लॅश लाईट आहे.
  • तसेच, दोन्ही फोनमध्ये फ्रंटला दोन्ही स्क्रीन कर्व्ड मिळेल आणि खाली टाईप-सी चार्जिंग पोर्ट व स्पिकर ग्रिल आहेत.

Vivo V40 आणि Vivo V40 Pro चे स्पेसिफिकेशन (कंफर्म)

  1. भारताच्या अधिकृत वेबसाईटनुसार Vivo V40 आणि Vivo V40 Pro स्मार्टफोन ZEISS ब्रँडेड कॅमेरा मॉड्यूल सह येईल. यात 50MP ZEISS टेलीफोटो पोर्ट्रेट कॅमेरा असेल.
  2. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी पण मोबाईलमध्ये 50 मेगापिक्सल ZEISS फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
  3. कंपनीने सांगितले आहे की हा स्मार्टफोन सीरीज 5,500mAh बॅटरीसह सर्वात पातळ डायमेंशन असणारी आहे.
  4. तसेच फोनला चार्ज करण्यासाठी ब्रँड 80 वॉट फ्लॅश फास्ट चार्जिंग असेल आणि यामध्ये पावर बॅकअपसाठी 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  5. वेबसाईट लिस्टिंगनुसार स्मार्टफोनमध्ये पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP68 रेटिंग बॉडी दिली जाईल.

Vivo V40 चे ग्लोबल स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Vivo V40 5G फोनमध्ये 6.78-इंचाचा 1.5K अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 120Hz ची रिफ्रेश रेट, 4500 निट्स पीक ब्राईटनेस आणि 2800 × 1260 चे स्क्रीन रिजॉल्यूशन प्रदान करण्यात आले आहे. तसेच, याची डिझाईन चीनमध्ये सादर केलेल्या Vivo S19 सीरीजशी मिळती जुळती आहे.
  • प्रोसेसर: मोबाईलमध्ये दमदार परफॉर्मन्ससाठी कंपनीने स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिपसेट आणि Adreno 720 जीपीयूला सेटअप केला आहे. ज्यामुळे युजर्सना चांगला अनुभव मिळेल.
  • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी डिव्हाईसमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR4X रॅम आणि 512 जीबी पर्यंत UFS 2.2 इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता Vivo V40 स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. ज्यात OIS सह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 50 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड Zeiss लेन्स, ऑरा लाईटसह मिळतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
  • बॅटरी: स्मार्टफोनमध्ये युजर्सना 5,500 mAh ची मोठी बॅटरी मिळते, ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी 80 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळत आहे. तर कंपनीने बॉक्समध्ये चार्जर दिला नाही.
  • इतर: इतर फिचर्स पाहता स्मार्टफोनमध्ये पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP68 रेटिंग, वायफाय 5, ब्लूटूथ 5.4, एनएफसी सारखे अनेक पर्याय मिळतात.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत Vivo V40 लेटेस्ट अँड्रॉईड 14 आधारित फनटच ओएस 14 वर चालतो.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here