6,000mAh battery आणि 24GB RAM च्या ताकदीसह iQOO Z9x झाला चीनमध्ये लाँच

आयकूने चीनमध्ये तीन नवीन मोबाईल फोन लाँच केले आहेत. कंपनीकडून iQOO Z9, iQOO Z9x आणि iQOO Z9 Turbo आणले गेले आहेत. झेड 9 आणि झेड 9 टर्बोची संपूर्ण माहिती येथे वाचू शकता. तसेच 24GB RAM (12GB+12GB) ची ताकद असणारा आयकू झेड 9 एक्स चे फिचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती पुढे देण्यात आली आहे.

iQOO Z9x चे स्पेसिफिकेशन

  • 6.72″ फुलएचडी+ 120 हर्ट्झ डिस्प्ले
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1
  • 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
  • 50 एमपी ड्युअल रिअर कॅमेरा
  • 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
  • 44 वॉट फास्ट चार्जिंग
  • 6,000 एमएएचची बॅटरी

स्क्रीन : आयकू झेड 9 एक्स 5 जी फोन 2408 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असणारी स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे ज्यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 1000 निट्स हाई ब्राईटनेस मिळते.

प्रोसेसिंग : iQOO Z9x अँड्रॉईड 14 आधारित फनटच ओएस 14 वर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी यात 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी एड्रेनो 710 जीपीयू आहे.

मेमरी : चीनमध्ये हा फोन 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅमवर लाँच झाला आहे. फोनमध्ये 12 जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी पण आहे जी फिजिकल रॅमसह मिळून याला 24 जीबी पर्यंत वाढवते. तसेच मोबाईलमध्ये 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी आयकू झेड 9 एक्स ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा मेन सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असणारा 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह मिळून चालतो. तसेच सेल्फी काढणेआणि रिल्स बनविण्यासाठी या फोनमध्ये एफ/2.05 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे,

बॅटरी : iQOO Z9x 5G फोन पावर बॅकपअसाठी 6,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here