Home बातम्या 6499 रुपयांमध्ये येऊ शकतो Tecno POP 6 Pro; लाँच डेट देखील लीक

6499 रुपयांमध्ये येऊ शकतो Tecno POP 6 Pro; लाँच डेट देखील लीक

6099 price smartphone Tecno POP 6 Pro india launch date and specifications

टेक्नोनं कालच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन TECNO Camon 19 Pro Mondrian 17,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे. हा फोन मिडरेंज सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. परंतु आता ज्या बजेट सेगमेंटमध्ये कंपनीचे सर्वाधिक स्मार्टफोन्स आहेत तिकडे कंपनी वळणार असल्याचं समजतं. टेक्नो इंडिया भारतात लवकरच अजून एक नवीन मोबाइल फोन Tecno POP 6 Pro नावानं लाँच करू शकते. 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की टेक्नो पॉप 6 प्रो 23 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबर दरम्यान भारतात लाँच होऊ शकतो तसेच 6499 प्राइस रेंजमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. कदाचित ही ऑफर प्राइस असू शकते, बाजारात हा फोन वेगळ्या किंमतीत येऊ शकतो.

Tecno POP 6 Pro ची लीक किंमत

कंपनीकडून अजूनतरी टेक्नो पॉप 6 प्रोच्या भारतीय लाँचची तारीख व प्राइस सांगण्यात आली नाही. परंतु आम्हाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा एक लो बजेट टेक्नो मोबाइल असू शकतो जो 6499 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. आम्हाला ही माहिती टेक्नो इनसाइडरकडून मिळाली आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की या फोनची लाँच प्राइस थोडी वेगळी असू शकते परंतु ऑफर प्राइसमध्ये हा फोन 6,499 रुपयांच्या रेंजमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. Tecno POP 6 Pro 23 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरच्या कालावधीत भारतात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. टेक्नो पॉप 6 प्रोची सेल Great Indian Festival मध्ये ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर होऊ शकतो. हे देखील वाचा: विवोपेक्षा स्वस्तात रंग बदलणारा स्मार्टफोन; 8GB RAM, 64MP कॅमेऱ्यासह Tecno CAMON 19 Pro Mondrian Edition भारतीयांच्या भेटीला

Tecno POP 6 Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स

टेक्नो पॉप 6 प्रोचे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्वस्त मोबाइल फोन 6.56 इंचाच्या एचडी+ डॉट नॉच डिस्प्लेवर लाँच होऊ शकतो. फोनची स्क्रीन 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करू शकते जी 2.5डी कव्हर ग्लासनं प्रोटेक्ट केली जाऊ शकते. फोन डिस्प्लेच्या खाली रुंद चिन पार्ट मिळू शकतो. भारतात Tecno POP 6 Pro ची विक्री Polor Black आणि Peaceful Blue कलरमध्ये उपलब्ध होऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी Tecno POP 6 Pro ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये ड्युअल फ्लॅशलाईटसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो जो सेकंडरी एआय लेन्ससह काम करू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टेक्नो मोबाइल 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो, सोबत फ्रंट फ्लॅश देखील मिळेल. हे देखील वाचा: Tecno Mobile Phones Under 7000: कमी बजेटमध्ये दमदार फीचरसह येणारे जबरदस्त स्मार्टफोन

Tecno POP 6 Pro ड्युअल सिमला सपोर्टसह बाजारात येऊ शकतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. या टेक्नो मोबाइलच्या उजव्या बाजूला वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन दिला जाऊ शकतो. तसेच लोवर पॅनलवर 3.5एमएम जॅक, यूएसबी टाईप सी पोर्ट आणि स्पिकर मिळू शकतात.