8GB RAM, 64MP कॅमेऱ्यासह Tecno CAMON 19 Pro Mondrian Edition भारतीयांच्या भेटीला

tecno launches tecno camon 19 pro mondrian know price and specifications

Tecno ब्रँडची ओळख कमी किंमतीत हाय क्वॉलिटी फीचर्स देणारा ब्रँड अशी आहे. हीच ओळख कायम ठेवत कंपनीनं 8GB RAM, 64MP कॅमेऱ्यासह Tecno Camon 19 Pro Mondrian Edition लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मल्टी कलर चेंजिंग टेक्नॉलॉजीसह भारतात सादर करण्यात आला आहे. जेव्हा फोनच्या बॅक पॅनलवर सूर्यप्रकाश पडेल तेव्हा या स्मार्टफोनचे रंग बदलतील. अशीच टेक्नॉलॉजी विवोच्या स्मार्टफोनमध्ये देखील देण्यात आली आहे. परंतु Tecno Camon 19 Pro Mondrian ची किंमत त्यापेक्षा कितीतरी कमी आहे. पुढे आम्ही Tecno च्या या नवीन स्मार्टफोनच्या किंमतीसह, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची संपूर्ण माहिती दिली आहे.

Tecno CAMON 19 Pro Mondrian Specifications

लेटेस्ट टेक्नो स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा फुल एचडी+ लो ब्लू लाइट Dot-in LTPS डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 1080x 2460 पिक्सल रिजॉल्यूशन मिळतं. डिस्प्लेवर नॉच डिजाइन देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये Helio G96 ऑक्टा कोर 2.05 GHz प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी Mali-G57 GPU देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 64MP कॅमेऱ्यासह OPPO F21s Pro 5G आणि 4G Phone भारतात लाँच; पाहा किंमत व स्पेसिफिकेशन्स

tecno launches tecno camon 19 pro mondrian know price and specifications

Tecno CAMON 19 Pro Mondrian Specifications स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. हा 5GB पर्यंतच्या व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो, त्यामुळे गरज पडल्यास तुम्ही 13GB पर्यंत रॅमची ताकद मिळवू शकता. तसेच या टेक्नो स्मार्टफोनमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीनं 512GB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल.

पावर बॅकअपसाठी या रंग बदलणाऱ्या स्मार्टफोनमध्ये दीर्घकाळ टिकणारी 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित XOS वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 2G, 3G, 4G, वायफाय 2.4, 5G, ब्लूटूथ 5.0, GNSS, Galileo, Beidou सारखे ऑप्शन्सर मिळतात.

tecno launches tecno camon 19 pro mondrian know price and specifications

फोटोग्राफी सेगमेंट पाहता, CAMON 19 Pro Mondrian स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 50 मेगापिक्सलची पोट्रेट लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा AI फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 50MP सेल्फी कॅमेरा आणि 20GB RAM सह Vivo V25 ची भारतात एंट्री; बॅक पॅनल बदलतो रंग

Tecno CAMON 19 Pro Mondrian Price

कंपनीनं Tecno Camon 19 Pro Mondrian Edition फक्त एक सिंगल स्टोरेज व्हेरिएंटसह बाजारात आला आहे. ज्यात 8GB रॅम + 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. हा फोन 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याची विक्री येत्या 22 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here