Tecno Mobile Phones Under 7000: कमी बजेटमध्ये दमदार फीचरसह येणारे जबरदस्त स्मार्टफोन

best tecno smartphone under 7000

Tecno Mobile Phones Under 7000: Tecno ब्रँडचं नाव काही लोकांनी ऐकलं नसेल परंतु कम बजेटमध्ये शानदार फीचर्स असलेले स्मार्टफोन्स ही हाँगकाँगची कंपनी विकते. विशेष म्हणजे कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये महागडे स्मार्टफोन्स नाहीत उलट बजेट फोन्सचा भरणा जास्त आहे. जर तुम्ही 7000 रुपयांपेक्षा कमी किंमत (Best Tecno Phones Under 7000) असलेला फोन विकत घेण्याची योजना बनवत असाल तर टेक्नो कंपनीचे तीन स्मार्टफोन – Tecno Pop 5 LTE, Tecno Spark Go Plus आणि Tecno Spark Go 2020 तुमच्यासाठी योग्य ऑप्शन ठरू शकतात. पुढे आम्ही तुम्हाला टेक्नो कंपनीच्या या स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे.

Best Tecno Smartphones Under 7000

Tecno Pop 5 LTE

Tecno Pop 5 LTE

Pop 5 LTE कंपनीचा बजेट स्मार्टफोन 6.52-इंच HD+ डिस्प्लेसह येतो, ज्याचे रिजोल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. हा फोन Android 11 आधारित HiOS वर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात MediaTek च्या क्वॉडकोर Helio A25 चिपसेटसह 2GB RAM मिळतो. टेक्नोच्या या फोनमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी आणि चार्जिंगसाठी मायक्रो USB पोर्ट आहे. Tecno Pop 5 LTE स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉकची सुरक्षा मिळते. हे देखील वाचा: एक-दोन नव्हे तर 10 इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करणार Honda; EV सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ

Tecno Spark Go Plus

Tecno Spark Go Plus

Tecno Spark Go Plus स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन HD+ (720 x 1600 पिक्सल) आहे. या फोनमध्ये मीडियाटेकचा Helio A22 चिपसेटसह ग्राफिक्ससाठी PowerVR GE8300 GPU देण्यात आला आहे. जोडीला 2GB RAM आणि 32GB स्टोरेज मिळते, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128GB पर्यंत वाढवता येते. टेक्नोच्या या फोनमध्ये 8MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन 4000mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे.

Tecno Spark Go 2020

Tecno Spark Go Plus 2020

Tecno Spark Go 2020 फोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिजोल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. Android 10 Go व्हर्जनवर चालणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेकचा क्वॉडकोर MediaTek Helio A20 प्रोसेसर, 2GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनच्या रियर पॅनलवर 13MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 13MP चा सेल्फी शुटर मिळतो. 5000mAh ची बॅटरी Tecno Spark Go 2020 ला पावर देते. हे देखील वाचा: या 5 कारणांमुळे Jio 5G ठरेल खास; जाणून घ्या लाँच डेट, प्लॅन्स आणि टेक्नॉलॉजीची माहिती

इतर ऑप्शन

जर तुम्ही तुमचं 7000 रुपयांपेक्षा जास्त वाढवलं तर Tecno चे आणखी स्मार्टफोन या बजेटमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. 7000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत Tecno Spark Go 2022, Tecno Spark Go 2021, Tecno Pop 5 Pro, Tecno Spark 7 आणि Tecno Spark 8C सारख्या स्मार्टफोनची निवड देखील तुम्ही करू शकता.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here