2 नोव्हेंबरला भारतात येत आहे 8GB रॅम असेलला हा दमदार स्मार्टफोन, Xiaomi-Realme ला मिळेल आव्हान

Vivo V-सीरीज मध्ये आपला लेटेस्ट डिवाइस Vivo V20 SE 2 नोव्हेंबरला भारतात लॉन्च करणार आहे. 91मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्स कडून हि माहिती मिळाली आहे. V20 सीरीज मध्ये या महिन्यात सादर केल्या गेलेल्या Vivo V20 च्या लॉन्चच्या वेळी कंपनीने Vivo V20 SE ची घोषणा पण केली होती. पण फोनची किंमत सांगितली नव्हती. तसेच आता कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि 2 नोव्हेंबरला हा फोन जगासमोर ठेवला जाईल. ऑफिशियल लॉन्चच्या आधी या मिड-रेंज फोनच्या भारतीय किंमतचा खुलासा झाला आहे. फोन ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर किंमतीसह लिस्ट झाला आहे.

प्री-बुकिंग ऑफर

वीवो वी 20 एसई प्री-बुकिंग ऑफर मध्ये आयसीआयसीआय, कोटक, बॅंक ऑफ बडोद्यासह 10 टक्क्यांपर्यंतचा कॅशबॅक, 1-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट, Jio आणि वोडाफोन आयडियाचे फायदे 10 हजार रुपयांपर्यंतचा बोनस आणि बोनस डेटा आणि वीवो अपग्रेड प्रोग्रामचा समावेश आहे.

Vivo V20 SE स्मार्टफोन किंमतीसह Croma आणि Reliance Digital रिटेलर प्लॅटफॉर्म वर स्पॉट केला गेला होता. ई-स्टोर वर 8 GB RAM + 128 GB सह 20,990 रुपयांमध्ये लिस्ट होता. फोन Gravity Black कलर मध्ये दिसला होता. ‘Vivo V20 सीरीज’ मध्ये Vivo V20, Vivo V20 SE आणि Vivo V20 Pro स्मार्टफोन इंटरनेशनल मार्केटच्या वेगवेगळ्या बाजारांमध्ये आला आहे. भारतात आतापर्यंत फक्त वीवो वी20 सादर केला गेला होता. पण आता वीवो वी20 एसई पण मार्केट मध्ये सादर केला जाईल.

Vivo V20 SE

वीवो वी20 एसई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.12 टक्के आहे. या फोन मध्ये 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

Vivo V20 SE अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटचओएस 11 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 11नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर चालणारा आक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट देण्यात आला आहे. मलेशिया मध्ये वीवो वी20 एसई 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लो बजेट मध्ये लॉन्च झाला Vivo Y3s स्मार्टफोन

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वी20 एसई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची बोका लेंस देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Vivo V20 SE डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी वी20 एसई मध्ये 33वॉट फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी असलेली 4,100एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनचे डायमेंशन 161 x 7.48 x 7.83एमएम आणि वजन 171 ग्राम आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here