लॉन्चच्या आधी Redmi Note 10 ची लाइव ईमेज आली समोर, स्पेसिफिकेशन्सचा पण झाला खुलासा

Redmi Note 10 चा फोटो

Redmi आपली Note 10 सीरीज ग्लोबली 4 मार्चला लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीने गेल्याच महिन्यात खुलासा केला होता कि हि सीरीज कंपनीद्वारे ग्लोबल टेक मंचावर सादर केली जाईल. पण अजूनही अधिकृतपणे खुलासा झाला नाही कि या सीरीजमध्ये कोण कोणते मॉडेल येतील. पण बोलले जात आहे कि या सीरीजमध्ये कंपनीद्वारे Redmi Note 10 चे 4G व 5G आणि Redmi Note 10 Pro चे 4G व 5G मॉडेल लॉन्च केले जातील. तसेच, आता या सीरीजच्या लॉन्चच्याआधी Redmi Note 10 ची लाइव इमेज समोर आली आहे, ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे. (redmi note 10 series live image specification launch soon)

लाइव इमेजच्याआधी हॅन्ड्स-ऑन व्हिडीओ झाला लीक

रेडमी नोट 10 ची लाइव इमेज XiaomiLeaksPH ने शेयर केली आहे. या लाइव इमेजच्याआधी एक हॅन्ड्स-ऑन व्हिडीओमध्ये फोनची फुल डिजाइन दाखवण्यात आली होती. चला जाणून घेऊया या फोनबाबत समोर आलेली नवीन माहिती सोबतच जुन्या रिपोर्ट्स मधील लीक.

हे देखील वाचा : 108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme X9 Pro, गेमिंग प्रोसेसेसर पण असेल यात

स्पेसिफिकेशन्स

नवीन लीकनुसार Redmi Note 10 मध्ये 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि मध्यभागी पंच-होल कटआउट असेल. तसेच फोनमध्ये Qualcomm Snapdragon 678 SoC पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी असू शकते. फोनमधील बॅटरी 33W फास्ट-चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते. तसेच फोनमध्ये डुअल-स्पीकर आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस व मॅक्रो सेंसर असेल.

डिजाइन

काही दिवसांपूर्वी मनु कुमार जैन यांनी कन्फर्म केले होते कि Redmi Note 10 सीरीजमध्ये 120Hz डिस्प्ले आणि 5MP सुपर मॅक्रो लेंस असेल. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या हॅन्ड्स-ऑन व्हिडीओ Grey colour ऑप्शन दिसला आहे. तसेच फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5एमएम ऑडियो जॅक, स्पीकर ग्रिल आणि माइक्रोफोन बॉटमला असेल. तसेच फोनमध्ये अजून एक स्पीकर ग्रिल व आईआर ब्लास्टर दिला जाईल.

ओएस व स्टोरेज

फोनमध्ये वॉल्यूम रॉकर व पावर बटन उजवीकडे व सिम-ट्रे डावीकडे दिला जाईल. ‘About Phone’ सेक्शन मध्ये खुलासा झाला होता कि Redmi Note 10 अँड्रॉइड 11-based MIUI 12 कस्टम स्किन व 128जीबी स्टोरेज असेल.

हे देखील वाचा : 108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme X9 Pro, गेमिंग प्रोसेसेसर पण असेल यात

रेडमी नोट सीरीजचा दबदबा

काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता, त्यात शाओमीने माहिती दिली होती कि रेडमी नोट सीरीज स्मार्टफोनचे आतापर्यंत ग्लोबली 20 कोटींपेक्षा जास्त यूनिट्स विकले गेले आहेत. या सीरीजचा फोन 2014 मध्ये आला होता. कंपनीने असे पण सांगितले आहे कि रेडमी नोट 8 स्मार्टफोन 1 जानेवारी पासून 30 जून दरम्यान विकला गेलेला जगातील दुसरा बेस्ट-सेलिंग फोन आहे.

शाओमी रेडमी नोट 10 व्हिडीओ

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here