पबजी खेळण्यासाठी घरच्यांनी फोन घेऊन दिला नाही म्हणून तरुणाने केली आत्महत्या

प्लेयर अननोन्स बॅटलग्राउंड म्हणजे पबजी गेमची लोकप्रियता सध्या गगनाला भिडली आहे. एंडरॉयड यूजर्स सोबत पीसी आणि आईओएस डिवाइस वर हा गेम मोठयाप्रमाणावर तरुणपिढी खेळात आहे. पण आता या गेम मुळे तरुण आत्महत्येसारखे पाऊल उचलायला मागे पुढे बघत नाही आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार मुंबई मधील एका 18 वर्षीय युवकाने आपल्या घरच्यांकडे पबजी गेम खेळण्यासाठी हाई एंड स्मार्टफोन विकत घेऊन देण्याची मागणी केली होती, पण घरच्यांनी नकार दिल्याने त्याने गळफास लावून आत्महत्या केली.

मुंबई मधील नेहरू नगर, कुर्ला येथील युवकाला ऑनलाइन गेम पबजी खेळण्यासाठी एक हाई एंड स्मार्टफोन हवा होता, ज्याची किंमत जवळपास 37,000 रुपये होती. पण घरचे 20,000 रुपये देण्यास होते.

घरच्यांनी फोन घेऊन न दिल्याच्या रागात युवकाने पंख्याला लटकून आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. विशेष म्हणजे जगभरात या गेमचे 20 कोटी यूजर्स आहेत.

पबजी किती प्रसिद्ध आहे याचा अंदाज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पण या गेम विषयी जाणून आहेत यावरून तुम्हाला आलाच असेल. काही दिवसांपूर्वी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी परीक्षेविषयी चर्चा करताना पीएम मोदींनी पबजीचा उल्लेख केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here