व्हाट्सॅप व स्काइप वरून आता करता येणार नाही वीडियो कॉल, सरकार लावणार आहे निर्बंध

जसा जसा देशात इंटरनेट डाटा स्वस्त होत आहे आणि चांगल्या इंटरनेट कनेक्टिविटी वाले स्मार्टफोन बाजारात येत आहेत. त्याच वेगाने देशात इंटरनेट ऐप्लीकेशन्स चा वापर वाढत आहे. मेसेजिंग अॅप व्हाट्सॅप आज देशात जवळपास प्रत्येक घरात c
वापरला जात आहे. हा अॅप फक्त चॅटिंग पुरता मर्यादित राहिला नाही तर वॉयस आणि वीडियो कॉल मध्ये या व्हाट्सॅपचा खुप जास्त वापर होतो. पण आता येणार्‍या दिवसांमध्ये व्हाट्सॅप वरून वीडियो कॉल करण्यावर बंदी येऊ शकते.

व्हाट्सॅप सोबतच भारत सरकार स्काइप, गूगल डुओ आणि इमो सारख्या वीडियो कॉलिंग अॅप्स च्या वापरावर पण निर्बंध आणू शकते. भारतीय दूरसंचार विभाग ने इंटरनेट टेलीफोन च्या नियमांत बदल केला आहे. नियमांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की देशात वीडियो कॉलिंग ची सर्विस फक्त टेलीकॉम कंपन्याच देऊ शकतात. देशात व्हाट्सॅप सारखे अन्य अॅप्लीकेशन्स व प्लॅटफार्म ज्या वरून वीडियो कॉल केला जातो, त्या सर्वांना सरकार लवकरच वीडियो कॉलिंग फीचर बंद करायाला सांगू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार नवीन नियम जर यशस्वीरीत्या लागू झाले तर वीडियो कॉलिंग ची परवानगी फक्त टेलिकॉम कंपन्यांना मिळेल. डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्यूनिकेशन ने टेलीकॉम कंपन्यांना पण आदेश दिला आहे की त्यांना वीडियो कॉलिंग साठी आपला स्वतःचा वीडियो कॉलिंग अॅप बनवून देशात लॉन्च करावा लागेल. तसेच अन्य कोणत्याही प्लॅटफार्म ला जर वीडियो कॉलिंग चा फीचर ठेवायचा असेल तर त्यांना सरकार कडून लाइसेंस घ्यावा लागेल.

विशेष म्हणजे डीओटी ने इंटरनेट टेलीफोनी वर शिक्कामोर्तब केला आहे. इंटरनेट टेलीफोन अंतर्गत वीना सेल्यूलर नेटवर्क म्हणजे वीना डाटा पॅक वाईफाई वापरून वॉयस कॉल सारखे इंटरनेट कॉल करता येऊ शकतात. ही स​र्विस संपूर्ण देशात यशस्वीरीत्या लागू करण्यासाठी पब्लिक वाईफाई स्पॉट बनवण्यात येतील. या वाईफाई कनेक्शन वरून वॉयस कॉल केल्यास यूजर्सना डाटा शुल्क द्यावे लागणार नाही. पण सरकार व्हाट्सॅप सारख्या अॅप वर वीडियो कॉलिंग बंद करण्यापुर्वी आपल्या नवीन नियमा अंमलात आणेल. हे सर्व प्रत्यक्षात यायला वेळ जाऊ शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here