Poco X5 Pro नंतर आता आली POCO C55 ची बातमी

पोको संबंधित एक बातमी कालच आली होती की कंपनी चीनमध्ये आलेला Redmi Note 12 Pro Speed Edition भारतात POCO X5 Pro 5G नावानं लाँच करू शकते. तर आता या ब्रँडची आणखी एक बातमी समोर आली आहे की चीनमध्ये लाँच झालेला Redmi 12C स्मार्टफोन देखील भारतीय बाजारात POCO C55 च्या रूपात पदापर्ण करू शकतो. कंपनीनं या फोन्सच्या नावांबद्दल किंवा लाँचबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु असे दिसते आहे की चीनमध्ये जे फोन रेडमी ब्रँड अंतगर्त आले आहेत तेच पोको ब्रँड अंतगर्त भारतात येऊ शकतात.

POCO C55 इंडिया लाँच

पोकोफोन लाँच संबंधित ही मोठी माहिती परदेशी टिपस्टर कॅस्परनं शेयर केली आहे. त्यानुसार POCO C55 स्मार्टफोन Redmi 12C चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. हा रेडमी मोबाइल अलीकडेच चीनमध्ये लाँच झाला होता जो आता पोको सी55 च्या रूपात ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. याआधी टिपस्टर योगेश बरारनं दावा केला होता की Xiaomi नं चीनमध्ये लाँच केलेला Redmi Note 12 Pro Speed Edition स्मार्टफोनच भारतात POCO X5 Pro नावानं येऊ शकतो आणि हा फोन याच महिन्यात अर्थात जानेवारी 2023 च्या अखेरपर्यंत भारतात लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येईल Samsung Galaxy A14 5G फोन; भारतीय लाँचपूर्वीच किंमत लीक

POCO C55 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.71 इंच डिस्प्ले
  • 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज
  • मीडियाटेक हीलियो जी85
  • 50एमपी ड्युअल कॅमेरा
  • 10वॉट 5,000एमएएच बॅटरी

लक्षात असू दे की पोको कंपनीनं आतापर्यंत सी55 स्मार्टफोन संबंधित कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे आता आम्ही रेडमी 12सी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पोको सी55 मध्ये मिळतील असा अंदाज लावत आहोत. हा रेडमी फोन चीनमध्ये 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. या फोनची स्क्रीन 500निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करते. या फोनचे डायमेंशन 68.76×76.41×8.77एमएम आणि वजन 192ग्राम आहे.

Redmi 12C अँड्रॉइड ओएस आधारित मीयुआय 13 वर चालतो. या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये माली-जी52 एमपी2 जीपीयू देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4जीबी LPDDR4X RAM आणि 256जीबी eMMC 5.1 ROM ला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Pathaan Trailer Released: चार वर्षानंतर शाहरुख प्रमुख भूमिकेत; ‘पठाण’ चा ट्रेलर रिलीज

फोटोग्राफीसाठी रेडमी 12सी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 3.5एमएम जॅक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here