गेमिंग फोन्सची व्याख्या बदलण्यास येत आहे Nokia G10, लॉन्चच्याआधी बघा यातील फीचर्स

हा फोटो वनप्लस फोनचा आहे.

गेमिंग स्मार्टफोनचे वाढते मार्केट बघून, आता नोकियाचे फोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबल पण आपला नवीन आणि पहिला गेमिंग-सेंट्रिक फोन घेऊन येणार आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार Nokia-G सीरीजमध्ये नवीन हँडसेट लॉन्च केला जाईल. अशी माहिती टेक वेबसाइट NokiaPowerUser द्वारे समोर आली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि HMD Global चा हा फोन Nokia G10 नावाने सादर केला जाईल. या फोन सोबतच कंपनी आपली जी-सीरीज पण सादर करेल. याआधी फोन ऑनलाइन मॉडेल नंबर TA-1334 सह स्पॉट केला गेला आहे. (nokia g10 first gaming smartphone from hmd global launch soon specifications leaked)

Nokia G10 चे लीक स्पेसिफिकेशन्स

NokiaPowerUser च्या रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे कि G-सीरीजमध्ये येणाऱ्या Nokia G10 मध्ये एक ऑक्टा-कोर चिपसेट असेल. तसेच फोनमध्ये 6.4 इंचाच्या डिस्प्ले सपोर्ट असेल. पण अजूनतरी फोनच्या रिफ्रेश रेट आणि रिजोल्यूशनबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. रिपोर्टमध्ये पुढे खुलासा झाला आहे कि फोनच्या मागे क्वाड-कॅमेरा सेटअप दिला जाईल. या सेटअप मध्ये 48MP चा प्राइमरी कॅमेरा सेंसर असेल. तसेच रिपोर्टमध्ये इतर तीन सेंसरबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. आशा आहे कि फोनमध्ये अल्ट्रावाइड, डेप्थ आणि मॅक्रो लेंस असेल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M12 अमेझॉनवर लिस्ट, 6000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेऱ्यासह 11 मार्चला होईल लॉन्च

Nokia G10 लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट

NokiaMob नुसार Nokia G10 कंपनीच्या Russia वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज दिली जाईल. तसेच फोन ब्लू कलर ऑप्शनसह लिस्ट केला गेला आहे.

हे देखील वाचा : लॉन्च झाला 18GB रॅम असलेला जगातील पहिला आणि सर्वात पावरफुल स्मार्टफोन, आता बदलेल मोबाईल गेमिंगचे विश्व

सध्या नोकिया जी10 बाबत फक्त इतकीच माहिती आमच्याकडे आहे. पण आशा आहे कि येत्या काळात या डिवाइसबद्दल अधिक माहिती समोर येईल. एचएमडी ग्लोबलने आतापर्यंत नोकिया जी-सीरीज किंवा जी 10 लॉन्चची अधिकृत घोषणा केली नाही.

Nokia 6300

अलीकडेच Nokia 6300 च्या इंडिया लाॅन्चबद्दल बातमी समोर आली होती. रिपोर्टमध्ये अंदाज लावण्यात आला होता कि नोकिया 6300 4जी फोन येत्या काही दिवसांत भारतीय बाजारात लाॅन्च केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार भारतात या फोनची किंमत 5,000 रुपयांपेक्षा कमी असेल. तुम्हाला माहित असेल कि भारतात असलेले Nokia 5310 आणि Nokia 215 4G फीचर फोन 4,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here