ओपोने आणला सुंदर स्मार्टफोन OPPO A94, लुकसह फीचर्समध्ये पण करेल Xiaomi-Realme ची सुट्टी!

Oppo भारतात आज F19 सीरीज लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या सीरीजमध्ये कंंपनी F19 Pro आणि F19 Pro+ 5G हँडसेट लॉन्च केले जातील. या दोन्ही फोन्सच्या लॉन्चच्या आधी ओपोने आपल्या A-सीरीजचा पोर्टफोलियो वाढवत एक नवीन हँडसेट Oppo A94 लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीने UAE च्या टेक मार्केटमध्ये सादर केला आहे जो शानदार परफॉर्मंस सोबतच सुंदर डिजाइनवर टेक मंचावर आला आहे. हा फोन गेल्या वर्षी मार्केटमध्ये OPPO A93 फोनचा अपग्रेडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे. (oppo a94 launch with 8gb ram 48mp camera know price sale full specification)

डिजाइन

Oppo A94 कंपनीने फक्त 7.8mm जाडी आणि 172 ग्राम वजनसह सादर केला आहे. तसेच फोन Fluid Black आणि Fantastic Purple दोन कलर ऑप्शन मध्ये टेक मार्केटमध्ये आला आहे. डिजाइनबद्दल बोलायचे तर फोन होल-पंच डिस्प्लेवर लॉन्च केला आहे जो फ्रंटला टॉप-लेफ्ट कॉर्नरवर आहे. फोनच्या फ्रंटला तिन्ही कडा बेजल-लेस आहेत. तर, बॉटमला थोडा चिन पार्ट मिळतो. फोनच्या उजवीकडे ऑन-ऑफ बटन व लेफ्ट साइड वॉल्यूम रॉकर बटन मिळेल. तसेच फोनच्या मागे चौकोनी क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याच्या खाली एलईडी फ्लॅश लाइट आहे. त्याचबरोबर फोनच्या बॉटमला स्पीकर ग्रिल, टाइ-सी चार्जिंग पोर्ट आणि 3.5एमएम ऑडियो जॅक मिळेल.

हे देखील वाचा : गेमिंग फोन्सची व्याख्या बदलण्यास येत आहे Nokia G10, लॉन्चच्याआधी बघा यातील फीचर्स

दमदार कॅमेरा

वर सांगितल्याप्रमाणे कंपनीने Oppo A94 स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. या सेटअप मध्ये 48MP चा प्राइमरी सेंसर, दुसरा 8MP ची वाइड अँगल लेंस, तिसरी 2MP ची मॅक्रो लेंस आणि चौथा 2MP चा डेप्थ सेंसर आहे. तसेच फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हँडसेट टाइम-लॅप्स, पोट्रेट मोड आणि नाइट मोड सारख्या कॅमेरा फीचर्सला सपोर्ट करतो.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

ओपो ए94 स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,310mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 30W VOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1 आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसारखे फीचर्स आहेत. तसेच फोन अँड्रॉइड 11 बेस्ड कलरओएस 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

Oppo A94 चे स्पेसिफिकेशन

Oppo A94 स्मार्टफोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.43-इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजॉल्यूशन 1080 x 2400 पिक्सल आहे. त्याचबरोबर प्रोसेसिंग पावरसाठी स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio P95 प्रोसेसरसह 8GB of LPDDR4x रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज युजर माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकतात.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी असलेला Moto G10 Power उद्या होईल भारतात लॉन्च, पावरफुल Moto G30 ची पण होईल एंट्री

Oppo A94 ची किंमत

Oppo A94 स्मार्टफोन एका सिंगल वेरिएंट मधेच येतो. या फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत AED 1,099 (जवळपास 21,896 रुपये) आहे. भारतात या फोनच्या लॉन्चबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here