कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स देण्यासाठी प्रसिद्ध असलेला टेक ब्रँड Infinix लवकरच भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवणार आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 19 एप्रिलला इनफिनिक्स भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे जो Infinix Hot 10 Play नावाने बाजारात येईल. ब्रँडच्या इतर मोबाईल्स प्रमाणे इनफिनिक्स हॉट 10 प्ले पण एक लो बजेट डिवायस असेल जो 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये लॉन्च केला जाईल. (Infinix Hot 10 Play Launching in india on 19 april under 10k budget Price)
Infinix Hot 10 Play ची माहिती देत इनफिनिक्स इंडियाने सांगितले आहे कि कंपनी आपला हा नवीन डिवायस येत्या 19 एप्रिलला भारतात लॉन्च करेल. हॉंगकॉंग बेस्ड ब्रँडने दावा केला आहे कि हा मोबाईल 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये बाजारात येईल. लॉन्च डेटची माहिती देण्यासोबत इनफिनिक्सने सांगितले आहे कि हॉट 10 प्ले स्मार्टफोन भारतात चार कलर वेरिएंट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल ज्यात Morandi Green, 7 degree Purple, Aegean Blue आणि Obsidian Black चा समावेश असेल.
Infinix Hot 10 Play
इनफिनिक्स हॉट 10 प्ले चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला आहे जो 6.82 इंचाच्या एचडी+ आयपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो. ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन अँड्रॉइड 10 ओएसवर लॉन्च केला गेला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये हा फोन 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी 1टीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी Infinix Hot 10 Play च्या बॅक पॅनलवर एआय डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी पावर मॅरेथॉन टेक्नोलॉजीसह येते.
हे देखील वाचा : Realme चा ट्रिपल धमाका, 8 एप्रिलला एकसाथ लॉन्च करेल 3 नवीन व स्वस्त फोन
Infinix Hot 10 Play च्या इंडियन मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स कशे असतील याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आली नाही पण आशा आहे कि फोनचा इंटरनॅशनल मॉडेलच भारतीय बाजारात येईल. देशात हा फोन एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. इनफिनिक्स हॉट 10 प्ले च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 19 एप्रिलची वाट बघावी लागेल.















