Samsung कंपनी एकीकडे हायएन्ड स्पेसिफिकेशन्स असलेल्या फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करत आहे तर दुसरीकडे लो बजेट सेग्मेंटमध्ये पण कंपनी आपली पकड मजबूत करत आहे. भारतीय मोबाईल युजर्सच्या गरजा समजून सॅमसंग कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन घेऊन येत आहे जे खूप पसंतीस उतरत आहेत. त्यानुसार कंपनीने आज भारतात दोन नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F02s आणि Samsung Galaxy F12 लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी एफ02एस एंट्री लेवल डिवायस आहे तर गॅलेक्सी एफ12 48एमपी ट्रिपल कॅमेरा, 90हर्ट्ज डिस्प्ले आणि 6,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. (samsung galaxy f12 officially launch in india price specs sale offer)
लुक व डिजाईन
Samsung Galaxy F12 वॉटरड्रॉप नॉच डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर उजव्या बाजूला वर चौकोनी रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात चार कॅमेरा सेंसर आहेत. फोनचा बॅक पॅनल हलकासा रग्ड बनवण्यात आला आहे ज्यावर वर्टिकल शेप लाईन्सची डिजाईन बनवण्यात आली आहे. फोनच्या लोवर पॅनलवर यूएसबी टाईपी सी पोर्ट, स्पीकर आणि 3.5एमएम जॅक दिला आहे तर राईट पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F12 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. सॅमसंगने याला इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेचे नाव दिले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ12 अँड्रॉइड 11 ओएसवर लॉन्च केला गेला आहे जो वन युआय 3.1 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 8नॅनोमीटर फेब्रिकेशनवर बनलेला सॅमसंगचा एक्सनॉस 850 चिपसेट देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एफ12 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. इथे एक GM2 सेंसर आहे जो ISOCELL Plus टेक्नोलॉजीवर चालतो. त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Samsung Galaxy F12 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी गॅलेक्स एफ12 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
वेरिएंट्स व प्राइस
Samsung Galaxy F12 दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिंएटमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे, तर 4 जीबी + 128 जीबी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ1 येत्या 12 एप्रिलपासून Sea Green, Sky Blue आणि Celestial Black कलर वेरिएंट्समध्ये विकत घेता येईल.














