4 जुलै ला लॉन्च होईल 8जीबी रॅम वाला असूस झेनफोन 5झेड, फ्लिपकार्ट पर होगी एक्सक्लूसिव सेल

असूस बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होत की कंपनी लवकरच भारतीय बाजारात आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन झेनफोन 5झेड लॉन्च करणार आहे. बोलले जात आहे की कंपनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै च्या सुरवातीच्या आठवड्यात हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल. तसेच आता शॉपिंग साइट फ्लिपकार्ट ने ही माहिती आॅफिशियल केली आहे की असूस झेनफोन 5झेड आगामी 4 जुलै ला भारतीय बाजारात येत आहे.

शॉपिंग साइट फ्लिपकार्ट ने प्रोडक्ट पेज बनवून असूस झेनफोन 5झेड च्या लॉन्च डेट चा खुलास केला आहे. फ्लिपकार्ट ने ya वेबपेज वर सांगितले आहे की येणार्‍या 4 जुलै ला असूस भारतात एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या इवेंट मधून कंपनी चा हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन झेनफोन 5झेड भारतीय टेक बाजारात लॉन्च केला जाईल. हा लॉन्च ईवेंट 4 जुलै ला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल आणि फ्लिपकार्ट या ईवेंट चे लाइव अपडेट देईल.

असूस झेनफोन 5झेड च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 2246 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या मोठ्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह हा स्मार्टफोन क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट 845 वर चालेल. कंपनी ने हा फोन 6जीबी रॅम तसेच 8जीबी रॅम सह बाजारात सादर केला आहे. असूस चा हा फोन 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी च्या स्टोरेज आॅप्शन मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. झेनफोन 5झेड च्या बॅक पॅनल वर फिं​गरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच याची शक्यता पण जास्त आहे की बाजारात हा फोन फेस अनलॉक टेक्निक सह येईल. बेसिक कनेक्टिविटी आॅप्शन्स व काही शानदार फीचर्स सह या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

असूस झेनफोन 5झेड भारतात किती रॅम किंवा स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च होईल तसेच या फोन ची किंमत काय असेल यासाठी फोन लॉन्च ची वाट बघितली जात आहे. हा फोन फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव असेल हे स्पष्ट झाले आहे तसेच देशात या फोन चा पहिला सेल ​कधी होईल याची माहिती पण 4 जुलै ला फोन लॉन्च झाल्यावर मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here