12GB रॅम आणि 120W फास्ट चार्जिंग; गेमर्ससाठी iQOO Neo 7 झाला भारतात लाँच

Highlights

  • iQOO Neo 7 गेमिंग फोन म्हणून भारतात लाँच झाला आहे.
  • 12GB RAM सह हा MediaTek Dimensity 8200 वर चालतो.
  • आयकू नियो 7 मध्ये 120W fast charging आणि 64MP Camera सारखे फीचर्स मिळतात.

चिनी कंपनी आयकूचा दिवसेंदिवस भारतीय बाजारावरील आपली पकड मजबूत करत आहे. कंपनी बजेट, मिडरेंज आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करून ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. आज कंपनीनं भारतात मिडरेंजमध्ये पावरफुल मोबाइल फोन iQOO Neo 7 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन गेमिंगसाठी खास आहे जो 12GB RAM आणि MediaTek Dimensity 8200 वर चालतो. या फोनमध्ये 120W fast charging आणि 64MP Camera सारखे फीचर्स मिळतात. आयकू नियो 7 इंडिया प्राइस, सेल आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

iQOO Neo 7 Price

आयकू नियो 7 5जी फोन भारतीय बाजारात दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये आला आहे. 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 33,999 रुपयांमध्ये विकला जाईल. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआय कार्डवर कंपनी 1500 रुपयांचा डिस्काउंट देत ज्यामुळे आयकू नियो 7 ची किंमत 28,499 रुपये आणि 32,499 रुपये होईल. हे देखील वाचा: 108Km रेंज सह येतेय 2023 Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर! लवकरच होणार लाँच

iQOO Neo 7 Specifications

  • 6.78″ AMOLED 120Hz Display
  • 12GB RAM + 256GB Storage
  • MediaTek Dimensity 8200
  • 64MP Triple Camera
  • 120W fast charging
  • 5,000mAh Battery

आयकू नियो 7 स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 300हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. या स्क्रीनवर 1300निट्स ब्राइटनेस आणि 388पीपीआयचा सपोर्ट मिळतो जी 2डी ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आली आहे.

iQOO Neo 7 मध्ये प्रोसेसिंगसाठी 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 8200 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. गेमिंगसाठी हा फोन Large Vapor Chamber + multi-layer graphite 3D cooling सिस्टम टेक्नॉलॉजीसह येतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एआरएम माली-जी610 जीपीयू आहे.

फोटोग्राफीसाठी आयकू नियो 7 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो ओआयएस फीचरसह येतो. त्याचबरोबर रियर पॅनलवर एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची बोका लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: स्वस्तात 6GB RAM आणि 5000mAh ची बॅटरी; POCO C55 च्या भारतीय लाँचचा मार्ग मोकळा

iQOO Neo 7 अँड्रॉइड 13 ओएसवर बनलेला आहे तसेच फनटच ओएस 13 वर चालतो. या फोनमध्ये 5जी आणि 4जी दोन्ही वापरता येतं. पावर बॅकअपसाठी आयकू नियो 7 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here