200MP Camera असणारा Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ या दिवशी भारतात लाँच, जाणून घ्या तारीख

Realme 12 Pro Series ची वाट भारतीय मोबाइल युजर्स पाहत आहेत. काही दिवसांमध्ये भारतात लाँच होणारा Redmi Note 13 series नंतर टेक लवर्स पण रेडमी आणि रियलमी टक्कर बघण्यासाठी तयार आहेत. यादरम्यान कंपनीकडून रियलमी 12 प्रो सीरीज लाँच डेटची घोषणा करण्यात आली आहे. ब्रँडने घोषणा केली आहे की Realme 12 Pro Series 29 जानेवारी 2024 ला भारतात लाँच होईल.

Realme 12 Pro Series लाँच माहिती

रियलमी 12 प्रो सीरीज 29 जानेवारीला भारतात लाँच होईल. कंपनीने माहिती देत सांगितलं आहे की फोन लाँच इव्हेंट 29 जानेवारीला दुपारी 12 वाजता सुरु होईल. ब्रँडच्या ‘नबंर’ सीरीज नुसार नवीन फोन भारतीय बाजारात येणार आहे. या दिवशी Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ भारतात लाँच होणार आहे. या लाँच इव्हेंटला कंपनीच्या वेबसाइटसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण लाइव्ह दिसणार आहे. , ज्याचा लिंक आम्ही लवकरच येथे शेअर करणार आहोत.

Realme 12 Pro Series चा कॅमेरा

कंपनीने सांगितले आहे की रियलमी 12 प्रो सीरीजमध्ये 200 मेगापिक्सल क्षमता असलेला कॅमेरा सेन्सर दिला जाईल. हा realme Periscope Camera असेल जिसे 200 एमपी सेन्सर पण चांगला असणार आहे. यात 120X Zoom आणि 3X Zoom ची ताकद मिळेल. तसेच 80mm Focal Length ची ताकद पण मिळेल. सध्या ब्रँडकडूव सर्व सेन्सरची मेगापिक्सल पावर ऑफिशियल करण्यात आलेली नाही. यासाठी 29 जानेवारीची वाट पाहिली जात आहे. तसेच लीक्सनुसार Realme 12 Pro+ स्मार्टफोनला सेल्फी काढण्यासाठी आणि रील्स बनवण्यासाठी 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Realme 12 Pro series स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • Curved AMOLED Display
  • Snapdragon 7s gen 2
  • 16GB RAM + 1TB Storage
  • 4,880mAh Battery
  • 120W Fast Charging
  • स्क्रीन: अलीकडेच समोर आलेल्या लीक्स नुसार रियलमी 12 प्रो आणि प्रो+ दोन्ही स्मार्टफोन्समध्ये कर्व ऐज अ‍ॅमोलेड डिस्प्ले पाहायला मिळू शकतो. स्क्रीन साइज समोर आलेली नाही, परतुं यामध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश दिला जाऊ शकतो तसेच सोबत इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण पाहायला मिळू शकतो.
  • डिजाइन : Realme 12 Pro फोन ब्लॅक, ऑरेंज आणि क्रीम कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. फोनच्या बॅक पॅनलवर पिवळ्या कलरची सेंटर पॉइंटवर स्ट्रिप दिली जाऊ शकते. डिवाइस के दोन मॉडेल वेगन लेदर फिनिश आणि एक ग्लास बॅकसोबत सादर असू शकतो.
  • प्रोसेसर: समोर आलेल्या माहितीनुसार रियलमी 12 प्रो प्लस स्मार्टफो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7एस जेन 2 चिपसेट पाहायला मिळू शकते. तसेच सीरीजच्या प्रो मॉडेल 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर चिपसेट दिला जाणार असल्याची गोष्ट लीकमध्ये समोर आली आहे.
  • मेमरी: डेटा स्टोर करण्यासाठी दोन्ही स्मार्टफोन चार स्टोरेज ऑप्शनमध्ये एंट्री घेऊ शकतो. ज्यामध्ये 6GB रॅम + 128GB स्टोरेज, 8GB रॅम +256 जीबी स्टोरेज, 12जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज आणि 16GB रॅम +1TB स्टोरेज असू शकते.
  • बॅटरी: Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ दोन्ही मॉडेल्स मध्ये पावर बॅकअपसाठी 4,880एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. परंतु ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी दोन्ही स्मार्टफोन्समध्ये वेगवेगळ्या चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते, जी 120 वॉट पर्यंतच्या असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here