Oppo ने दिला Xiaomi, Realme आणि Samsung ला जबरदस्त धक्का, कमी केली दमदार स्मार्टफोनची किंमत

OPPO A53 चा 4G व्हेरिएंट

OPPO ने भारतीय बाजारात Xiaomi, Realme आणि Samsung सारख्या ब्रँड्सना झटका देत आपल्या दमदार स्मार्टफोन Oppo A53 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने 2500 रुपयांची कपात केली आहे. ओप्पोच्या स्मार्टफोन Oppo A53 च्या नवीन किंमती आज 30 एप्रिलपासून लागू होती. Oppo A53 स्मार्टफोन कंपनीने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च केला होता. कंपनीने अलीकडेच या स्मार्टफोनचा 5G वेरिएंट पण लॉन्च केला आहे. पण कंपनीने 4G वेरिएंटच्या किंमतीत कपात केली आहे. (Oppo A53 gets new price in India check new price specifications)

Oppo A53 ची नवीन किंमत

Oppo A53 स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारात दोन वेरिएंटमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन आता 10,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यापूर्वी ओप्पोचा हा फोन 12,990 रुपयांमध्ये विकला जात होता. तसेच या स्मार्टफोनचा टॉप वेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह आता 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. किंमतीत कपात होण्यापूर्वी या स्मार्टफोनची किंमत 15,490 रुपये होती. म्हणजे या वेरिएंटची किंमतीत 2500 रुपयांनी कमी झाली आहे.

हे देखील वाचा : फक्त 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन OPPO A53s, Xiaomi आणि Realme ला आव्हान मिळणे निश्चित

Oppp A53 स्पेसिफिकेशन्स

OPPO A53 स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1600 x 720 पिक्सल आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेटसह 4GB आणि 6GB रॅम ऑप्शनसह सादर केला गेला आहे. OPPO A53 स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी रियर पॅनलमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : OPPO A95 5G स्मार्टफोन 48MP कॅमेरा, 4,310mAh बॅटरी आणि फास्ट चार्जसह झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता OPPO A53 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पोच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिविटी पाहता या फोनमध्ये डुअल सिम 4G VoLTE सपोर्ट, 3.5mm ऑडियो जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत.

ओपो ए53 2020 व्हिडीओ

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here