ASUS ची अपकमिंग ZenFone 8 सीरीज लॉन्चसाठी तयार आहे. Asus ZenFone 8 सीरीजचे स्मार्टफोन 12 मेला ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च होणार आहेत. ताज्या बातम्यांनुसार आसुसची हि सीरीज भारतात लॉन्च होण्यास तयार आहे. या सीरीजचा स्मार्टफोन ज्याचा मॉडेल नंबर ASUS_I007D आहे, त्याला BIS चे सर्टिफिकेशन मिळेल आहे. सध्या आसुसच्या या स्मार्टफोनचे मार्केटिंग नाव समोर आले नाही. अंदाज लावला जात आहे कि हा ASUS ZenFone 8 Pro असू शकतो. आसुसच्या ZenFone 8 सीरीजचे तीन स्मार्टफोन – ZenFone 8 Mini, ZenFone 8, आणि ZenFone 8 Pro सादर केले जाऊ शकतात. सध्या ZenFone 8 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स माहित नाहीत. पण बोलले जात आहे कि हा फोन Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर, 120Hz OLED डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. तसेच आगामी ZenFone 8 सीरीजमध्ये फ्लिप कॅमेरा मॉड्यूल दिला जाणार नाही. (Asus Zenfone 8 Pro listed on BIS certification India launch confirm)
ASUS ZenFone 8 Mini स्पेसिफिकेशन्स (लीक)
ZenFone 8 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन समोर आले नाहीत, पण ZenFone 8 Mini स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन ऑनलाइन लीक झाले आहेत. बातम्यांनुसार ZenFone 8 Mini मध्ये 5.92-इंचाचा OLED FHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्यात सेल्फीसाठी पंच होल कटआउट दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. आसुसच्या या फोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 64MP Sony IMX686 सेंसर आणि सेकंडरी कॅमेरा नवीन Sony IMX663 सेंसर असलेला असेल. आसुसचा हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 चिपसेटसह 16GB RAM आणि 256GB स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा : WhatsApp ग्रुपमध्ये शेयर झालेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी अॅडमिन नाही जबाबदार – हायकोर्ट
आसुसच्या या फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी आणि 30W फास्ट-चार्जला सपोर्ट दिला जाईल. आसुसचा हा फोन IP68 रेटिंगसह सादर केला गेला आहे. ZenFone 8 Mini स्मार्टफोन बाबत बोलले जात आहे कि हा Android 11 वर आधारित Zen UI वर चालतो.
हे देखील वाचा : iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये दिला जाऊ शकतो 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले
कनेक्टिविटी पाहता या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट दिला जाऊ शकतो. ZenFone 8 आणि ZenFone 8 Pro दोन्ही स्मार्टफोनबाबत जास्त माहिती समोर आली नाही. अंदाज लावला जात आहे कि आसुसचे दोन्ही स्मार्टफोन OLED display, 120Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 888 SoC, 5G कनेक्टिविटी, मल्टीपल कॅमेरा आणि पंच होल डिजाइन सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केले जाऊ शकतात.














