iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये दिला जाऊ शकतो 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले

Apple iPhone 13 120Hz डिस्प्ले

Apple च्या आगामी iPhone 13 सीरीजच्या लॉन्चला जरी खूप वेळ अजून बाकी असला तरी यासंबंधित लीक रिपोर्ट समोर येऊ लागले आहेत. iPhone 13 सीरीजबद्दल बातम्या येत आहेत कि अ‍ॅप्पल यात 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देऊ शकते. हाय रिफ्रेश रेट डिस्प्लेसाठी अ‍ॅप्पल साउथ कोरिया टेक कंपनी सॅमसंगची मदत घेऊ शकते. लीक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे कि अ‍ॅप्पल iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max स्मार्टफोनमध्ये नवीन LTPO AMOLED स्क्रीन मिळू शकते जिचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. हा डिस्प्ले एक्सक्लूसिवली सॅमसंग तयार करते. इतकेच नव्हे तर सॅमसंग अ‍ॅप्पलला Samsung Electro-Mechanics रिग्ड फ्लॅसिबल प्रिंटेट सर्किट बोर्ड्स (RFPCB) पण पुरवत आहे. (Apple iPhone 13 Pro and iPhone 13 Pro Max may be come with 120hz refresh rate display)

RFPCB चा वापर मेन बोर्डशी OLED पॅनल जोडण्यासाठी केला जातो. RFPCB सर्किट बोर्ड मजबूत (rigid) असण्यासोबतच फोल्ड करता येतात. हे सर्किट बोर्ड खूप सोयीस्कर प्रोडक्ट डिजाइनसह इलेक्ट्रॉनिक सिंग्नलचे वेगवान ट्रांसमिशन करतात. RFPCB सर्किट बोर्ड पारंपरिक सर्किट बोर्ट FPCB च्या तुलनेत महाग आहेत.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी असलेले टॉप 5 स्मार्टफोन, किंमत 8 हजारांपेक्षा पण कमी

Samsung Electro-Mechanics ने गेल्यावर्षी RFPCB च्या बिजनेसमधून बाहेर पडण्याचा विचार केला होता. गेल्या काही वर्षांत नफा न झाल्यामुळे सॅमसंगने हि घोषणा केली होती. कंपनीने हे सर्किट बोर्ड याआधी iPhone 12साठी पुरवले होते. iPhone 13 सीरीजसाठी RFPCB सर्किट बोर्ड बनवल्यानंतर कंपनी हा बिजनेस बंद करू शकते.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त फोन Realme C20A लॉन्चसाठी तयार, जाणून घ्या खासियत

Apple च्या iPhone साठी Samsung Display यावर्षी 110 मिलियन पॅनल पुरवू शकते. त्यानंतर LG Display साठी हा आकडा 50 मिलियन आणि BOE चा 9 मिलियन होण्याची शक्यता आहे.

2023 मध्ये येऊ शकतो फोल्डेबल iPhone

Apple अनॅलिस्ट Ming-Chi Kuo यांनी दावा केला आहे कि अ‍ॅप्पल 2023 मध्ये पहिला फोल्डेबल iPhone लॉन्च करू शकते. त्यांनी दावा केला आहे कि अ‍ॅप्पल 15 ते 20 मिलियन फोल्डेबल आयफोन मार्केटमध्ये आणू शकते. बातम्यांनुसार अ‍ॅप्पलला फोल्डेबल डिस्प्लेचा पुरवठा सॅमसंग करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here